महाराष्ट्रातील काही भागातील शेतकऱ्यांचं मत आहे की शेती परवडत नाही. शेती न परवडण्याचे मुख्य दोन कारणे आहेत एक म्हणजे पाणी आणि दुसरा म्हणजे उत्पादन खर्च. खरंतर शेतीची आणि शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था ही शेतीवर होणाऱ्या खर्चावर अवलंबून आहे.
महाराष्ट्रातील शेती प्रश्नावर भाष्य करणारे अनेक नेते व खासगी कृषी निविष्ठा कंपन्या सातत्याने एक सूर काढत असतात तो म्हणजे शेतीचे उत्पन्न वाढवू या परंतु गेली अनेक वर्षे शेतकरी श्रीमंत का होत नाही, त्याचा पिकावर उत्पादन खर्च किती होत आहे, व शेतकऱ्याला नफा किती राहत आहे यावर कोणीही बोलत नाही. त्यामुळे या सर्वांनीच या प्रश्नावर तोडगा काढायला पाहिजे, तेव्हाच शेतकरी श्रीमंत होईल आणि शेतकऱ्याला शेती परवडेल. शेती परवडण्यासाठी दोन उत्तम उदाहरणे आहेत की सेंद्रिय शेती आणि शेतमालावर प्रक्रिया करून विक्री.
हेही वाचा : माझं मत - 'सेंद्रीय शेतीकडे वळू, रासायनिक खतांना पळून लावू'
महाराष्ट्रातील अनेक शेतकरी सेंद्रीय शेती बरोबरच शेतीमालावर प्रक्रिया करून त्याची विक्री करतात. याच उलट काही शेतकऱ्यांचा असा भ्रम आहे की सेंद्रिय शेती केल्यावर उत्पादन कमी होते, परंतु हे साफ खोटं आहे हे काही शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे. त्यामूळे आपण शेंद्रिय शेतीकडे वळूयात कारण त्यामुळे आपण आपले अायुष्य सुद्धा वाढवु शकू कारण रासायनिक औषधांमुळे आपल्या आरोग्यावर खूप मोठा परिणाम होतो आहे. व त्याचबरोबर रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर होत चालल्याने जमीन निर्जीव अवस्थेत होत आहे व कालांतराने शेती सोडण्याचा मार्ग उभा राहू शकतो याचे उत्तम उदाहरण आपल्या समोर पंजाब राज्य हे आहे. पंजाब राज्यात पूर्वी रासायनिक खतांचा बेसुमार वापर केला जात होता त्यामूळे सद्यस्थितीत त्या जमिनीमध्ये सूक्ष्म जिवाणू हे नष्ट झाले आहेत.त्यामुळे सेंद्रीय शेतीच सर्व दृष्टिकोनातून चांगली राहील.
सध्या काही शेतकरी गरज नसतानासुद्धा काही औषधे कृषी केंद्रावरून वापर विकत आणतात जे की आपण घरच्या घरी बनवू शकू.जसे की हुमिक एसिड, स्टिकर, निंबोळी अर्क, कीटकनाशके, तणनाशके इत्यादी गोष्टी आपण घरच्या घरी बनवू शकतो आणि पिकांवरचा खर्च कमी करू शकतो. खासगी कंपन्यांचे खते किंवा औषधे हे खूप महाग असतात त्यामुळे शेतकऱ्यांना ते व्यवस्थित परवडत नाहीत आणि त्यांचा सूर असतो की आमच्याच कंपनीचे औषधे वापरा त्या औषधांमुळे फरक पडेलही परंतु त्या शेतकऱ्याचा खर्च किती वाढत आहे? असो खासगी कंपन्यांच्या प्रॉडक्ट चे दर ते ठरवतील परंतु शेतकऱ्यांना सुद्धा या गोष्टी समजल्याच पाहिजेत.
व त्याचबरोबर सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेतीचा खर्च आणि नफा जर जाणून घ्यायचा असेल तर अर्धी शेती रासायनिक व अर्धी शेती सेंद्रिय करून बघावी व त्याचा दैनिंदिन खर्च नोंद ठेवावी. त्यानंतर शेतकऱ्याला समजेल की खर्च कमी करूनसुद्धा आपण चांगले उत्पादन घेऊ शकतो.
गोपाल उगले
मो -9503537577
Share your comments