राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना उपयोगी ठरेल असे तंत्रज्ञान आणि लागणारी यंत्रसामग्री विकसित करण्यावर आयटीच्या संशोधकांनी भर द्यावा त्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी मुंबई आयआयटी येथे दिलेल्या भेटी प्रसंगी केले.
यावेळी त्यांनी आयआयटीच्या रूरल टेक्नॉलॉजी ॲक्शन ग्रुप तसेच सितारा ग्रुपच्या प्राध्यापक व संशोधक यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे आवाहन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की,राज्यातील शेतकऱ्यांसाठीविविध प्रकारच्या योजना राबविल्या जात आहेत तसेच राज्यातील शेतकरी व विशेषतः अल्पभूधारक शेतकऱ्यांन समोरील समस्या सोडवण्यासाठी कृषी विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.
या पार्श्वभूमीवर त्यांना उपयुक्त ठरेल असे तंत्रज्ञान आणि निविष्ठा खर्चात कपात होईल असे तंत्रज्ञान व यंत्रसामग्री विकसित करण्यावर आयआयटीने भर द्यावा.तसेच राज्याच्या विविध भागात शेतकरी स्वतःच्या प्रयोगांमधून विविध प्रकारची यंत्रसामग्री व तांत्रिक पद्धती विकसित करतात. त्यांच्या या प्रयोगाला तांत्रिक आणि शास्त्रीय पद्धतीने विकसित करण्यासाठी आयआयटी ने आणि कृषी महाविद्यालय आणि एकत्रित यावे असे आवाहनही त्यांनी केले. कृषी विभाग व आयआयटी यांच्या सहकार्यातून शेती समस्यांवरील उपाय शोधण्यासाठी प्रथमच प्रयत्न होत आहेत.
या माध्यमातून समस्यांवर निश्चित तोडगा निघेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला
या कार्यक्रमाला महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक विश्वजीत माने, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक गणेश पाटील, कृषी संचालक( गुणवत्ता) दिलीप झेंडे,संचालक( विस्तार आणि शिक्षण ) विकास पाटील,पोकराच्या मेघना केळकर, विजय केळकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
Share your comments