"पुणे तिथे काय उणे" असे म्हंटले जाते. आता याच पुण्याची देशभरात चर्चा सुरु आहे. चर्चेचे कारण आहे ते म्हणजे पुण्यातील एक दूध डेअरी. देशभरातील बडी हस्ती मुकेश अंबानी, अमिताभ बच्चन, सचिन तेंडूलकर, अक्षय कुमार आणि ह्रतिक रोशन यांच्या घरापर्यंत आपल्या डेअरीचे दुध पोचविण्याची किमया पुणे जिल्ह्यातील एका डेअरीने करुन दाखवली आहे.
एवढेच नाही तर आणखी देशातील २५ हजारहून सेलेब्रिटी घरांना ही डेअरी दूध पोचवते. देशाच्या सर्व प्रमुख शहरात त्यांचे दूध पोचते. ही किमया पुणे जिल्ह्यातील मंचरजवळील भाग्यलक्ष्मी डेअरीने केली आहे. (Mukesh Ambani, Amitabh Bachchan, Sachin Tendulkar, Akshay Kumar, Hrithik Roshan)
भाग्यलक्ष्मी डेअरीचे वैशिष्ट्ये
१. ३५ एकराच्या परिसरात पसरलेल्या या प्रकल्पात ३००० पेक्षा जास्त गायी आहेत.
२. या गायी दररोज २५ ते २८ लिटर दूध देतात.
३. सर्व गायी होल्स्टीन फ्रिजियन स्वित्झर्लंडच्या जातीच्या आहेत.
४. येथील सर्व यंत्रणा स्वयंचलित आहे. दूध काढण्यापासून बाटलीत भरण्यापर्यंत कोणत्याही क्रियेत मानवी स्पर्श होत नाही.
५. गायींच्या जवळच नव्हे तर शेतात येणाऱ्या व्यक्तीलाही आपले पाय निर्जंतुक करणे गरजेचे असते.
६. दूध काढण्यापूर्वी गायीची वैद्यकीय तपासणी होते. तिचे वजन आणि शरीराने तापमान मोजले जाते.
७. एखादी गाय आजारी असल्यास तिला तातडीने दवाखान्यात नेले जाते.
८. गायी आर ओचे पाणी पितात.
९. गायींना सोयाबीनशिवाय अल्फा गवत, हंगामी भाज्या आणि मक्याचा चारा दिला जातो.
१०. दूध सायलोमध्ये पाईप केले जाते आणि नंतर पाश्चरायझेशन करून बाटल्यांमध्ये पॅक केले जाते.
पुणे जिल्ह्यातील मंचरजवळील भाग्यलक्ष्मी डेअरी इथे दररोज २५००० लिटर दुधाचे उत्पादन होते. या दुधाचा दर्जा उच्च असल्याची पूर्ण खात्री दिली जाते. त्यामुळेच एक लिटरला १५२ रुपये अशी किंमत ही डेअरी आकारू शकते. एका शेतकरी याने हे सर्व वैभव उभे केले आहे.
भाताची सुधारित लागवड आणि अधिक उत्पादनासाठी 'या' पद्धतीचा अवलंब करा
Share your comments