1. बातम्या

एमएसपीच्या लालसेने शेतकऱ्यांनी वाढवले धान आणि गव्हाचे उत्पादन?

KJ Maharashtra
KJ Maharashtra
धान आणि गव्हाचे उत्पादन वाढले

धान आणि गव्हाचे उत्पादन वाढले

नवीन आलेल्या कृषी कायद्याच्या बाबतीत सरकारमध्ये भरपूर प्रमाणात आत्मविश्वास आहे, परंतु देशातील अन्नदाता या कायद्यांना विरोध करताना दिसत आहे. किमान आधारभूत किंमत म्हणजेच एमएसपी वरून शेतकरी संघटनांमध्ये नाराजी आहे.

एमएसपी मूल्यांच्या आधारे सरकार शेतकऱ्याद्वारे विकले जाणारे अन्नधान्य पूर्ण प्रमाणात खरेदी करते. याचा लाभ विशेष करून पंजाब हरियाणामधील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात घेतला आहे. परंतु हाती आलेल्या आकडेवारीवरून समजते की, पंजाबमधील शेतकऱ्यांनी एमएसपीच्या लालसेने फक्त गहू आणि धान या धान्य पिकांचे उत्पादन जास्त प्रमाणात घेतले आणि इतर पिकांचे उत्पादन भरपूर प्रमाणात कमी केली आहे.

 गहू आणि तांदळाचे उत्पादन वाढले

 • पंजाब मध्ये तांदळाचे उत्पादन १९६० ते ६१ मध्ये ४.८ टक्के होते, जे वाढून २०१८ ते १९ मध्ये ३९.६ टक्के झाले.

 • पंजाब राज्याने गहू उत्पादनात २७.३ टक्क्यांवरून ४४.९  टक्‍क्‍यांपर्यंत वाढ नोंदविली आहे.

 • पंजाब राज्याच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग त्यामध्ये १९६० ते ६१ मध्ये पंजाब मध्ये एकूण अन्नधान्य उत्पादनापैकी तांदळाचे उत्पादन ४.८ टक्के होते.

 • हरित क्रांतीचा अवलंब केल्यानंतर १९७०  ते ७१ मध्ये तांदळाचे उत्पादन ६.९ टक्के, १९८० ते ८१ मध्ये १७.५ टक्के, १९९० ते ९१ मध्ये २६.९ टक्के, २०००-०१  मध्ये ३१.३  टक्के आणि २०१८ ते १९ मध्ये ३९.९ टक्‍क्‍यांपर्यंत पोहोचले.

 • अशाच पद्धतीने पंजाबमध्ये गव्हाच्या उत्पादनाच्या बाबतीत वाढ नोंदवली गेली. १९६० ते ६१ मध्ये पंजाब राज्यात २७.३ टक्के उत्पादन गव्हाचे व्हायचे. ते १९७० ते एकतर मध्ये ४०.५ टक्के, २०००-०१ मध्ये ४३.१ टक्के आणि २०१८ ते १९ मध्ये ४४.९  टक्‍क्‍यांपर्यंत पोहोचले.

 

या पिकांच्या उत्पादनात आली कमी

 • १९६० या दशकाच्या तुलनेमध्ये २०१८ ते १९ मध्ये मका उत्पादन ६.९ टक्क्यांवरून घसरून १.४ टक्‍क्‍यांपर्यंत आली.

 • या प्रकारेच कडधान्य पिकांचे उत्पादन ३.९ टक्क्यांवरून घसरून ०.५ टक्क्यांवर आले.

 • कापसाचे उत्पादन ९.४ टक्क्यांवरून घसरून ५.१ टक्क्यांवर आले.

 • तसेच अन्य प्रकारच्या पिकांचे उत्पादन १७.७ टक्क्यांवरून २.४  टक्क्यांवर आले.

 • इतकेच नाही तर डाळवर्गीय पिकांच्या उत्पादन सुद्धा १९ टक्क्यांवरून घरून फक्त ०.४ टक्के राहिले आहे.

 

कमी होतो आहे जमिनीचा जलस्तर

शेतकरी मोठ्या प्रमाणात गव्हाचे आणि तांदळाचे उत्पादनाला जास्त महत्त्व देत आहेत. त्यामुळे जलतज्ज्ञांनी सांगितले आहे की, येथे पाण्याचा जास्त वापर होत असल्यामुळे पंजाब हरियाणा राज्यांमधील जलस्तर दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे हा चिंतेचा विषय आहे.

 

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters