
farmar
गेल्या काही दिवसांपासून राज्यात शेतकरी आणि महावितरण यांच्यात मोठा संघर्ष सुरु आहे. अनेक ठिकाणी यामुळे आंदोलने देखील करण्यात आली आहेत. शेतकऱ्यांची वीज तोडल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. अनेक ठिकाणी असा प्रकार अजूनही सुरूच आहे. असे असताना आता शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरुन दिले जाईल अशा घोषणा वैजापूर कन्नड तालुक्यातील शेतकऱ्यांना महावितरणमुळे नुकसान झाल्यास आता भरपाईही दिली जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याबाबत कार्यकारी अभियंत्यांनी आंदोलकांना पत्र दिले आहे.
यामध्ये 48 तासात जर रोहित्र दिले नाही तर प्रति तास 50 रुपये याप्रमाणे ग्राहकास रक्कम दिली जाणार आहे. याबाबत अनियमित विद्युत पुरवठ्यानंतर कन्नड शहरात माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी शेतकऱ्यांना घेऊन महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. यानंतर नुकसानभरापाईचे पत्र कार्यकारी अभियंता यांनी दिले आहे. यामुळे राज्यात इतर ठिकाणी देखील असे नियम लागू करावेत, अशी मागणी शेतकरी करत आहेत. या प्रकारामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
याबाबत हर्षवर्धन जाधव यांनी महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला होता. यामुळे आता महावितरणमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर भरपाई दिली जाणार असल्याचे कार्यकारी अभियंता दौड यांनी सांगितले आहे. महावितरणचे लेखी पत्रच असल्याने जर नियमाप्रमाणे विद्युत पुरवठा आणि दुरुस्तीची कामे झाली नाहीत तर शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईसाठी अर्ज करावेत. यामुळे आश्वासनाप्रमाणे मदत न मिळाल्यास पुन्हा आंदोलन केले जाणार असल्याचे जाधव यांनी सांगितले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या पत्रामध्ये रोहित्रामध्ये बिघाड झाल्यास ते 48 तासांमध्ये दुरुस्त करुन दिले जाणार आहे. कृषी ग्राहकांना 24 तास विद्युत पुरवठा केला जाणार आहे. तसेच विद्युत पुरवठा खंडीत झाल्यास 50 रुपये प्रति तास हे प्रत्येक ग्राहकांना अदा केले जाणार आहेत तर 48 तासांमध्ये रोहित्र न दिल्यास 50 रुपये प्रति ग्राहकास दिले जाणार आहेत, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. यामुळे प्रत्यक्षात ही भरपाई मिळणार का हे येणाऱ्या काळात समजेल. अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडीत होत असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
Share your comments