गेल्या काही दिवसांपासून राज्यात महावितरण विभाग चांगलाच चर्चेत आहे. शेतकरी आणि महावितरण यांच्यात मोठा संघर्ष सुरु आहे. असे असताना आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सोशल मीडियावर सध्या एक व्यक्ती महावितरणच्या अधिकाऱ्याला शिवीगाळ आणि मारहाण करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. अधिकाऱ्याला मारहाण केल्याने अनेकांनी तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
ही घटना चाळीसगावमधील आहे. चाळीसगावमधील महावितरणचे सहाय्यक अभियंता भरत उकलकर यांना शहरातील इंदिरा नगरमध्ये राहणाऱ्या धनराज अशोक पाटील या ग्राहकाने शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना घडली आहे. थकबाकी भरल्याचे कागदपत्रे मागितल्याने ही मारहाण करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
याबाबत माहिती अशी की, धराज पाटील याने थकबाकी भरून वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणच्या कार्यालयात जाऊन सहाय्यक अभियंता भरत उकलकर यांची भेट घेतली. यावेळी वीज पुरवठा सुरू करण्याची मागणी केली. मात्र, उकलकर यांनी त्याला कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगितले. यावर धनराज पाटील या ग्राहकाला प्रचंड राग आला आणि त्याने सहाय्यक अभियंता भरत उकलकर यांना शिवीगाळ करत मारहाण केली आहे. याचा विडिओ देखील व्हायरल झाला आहे.
याबाबत धनराज पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. सध्या राज्यात अनेक ठिकाणी अशा घटना घडत आहेत. सध्या येणारे वीज बिल पाहून सामान्य जनता संताप व्यक्त करत आहे. हा संताप महावितरणच्या अधिकाऱ्यांवर काढला जात आहे. आत्तापर्यंत अशा अनेक घटना घडल्या आहेत, ज्यामध्ये महावितरणच्या कार्यालयात जाऊन लोकांनी धिंगाणा घातला आहे. अनेकांना मात्र चुकीच्या पद्धतीने वाढीव बील देखील आले आहे. यामुळे अनेक नागरिक चिडून देखील आहेत.
अनेक शेतकऱ्यांना वीज नसताना देखील लाखो रुपयांचे बिल आले आहे. यामुळे अनेकदा अशा घटना घडत आहेत. यामुळे राज्यात सध्या मोठा संघर्ष सुरु आहे. अनेक शेतकरी अधिकाऱ्यांवर चिडून आहेत. शेतकऱ्यांची सध्या वीज मोठ्या प्रमाणावर तोडली जात आहे. यामुळे अनेक ठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरला आहे.
महत्वाच्या बातम्या;
बाजार समित्या टिकवण्यासाठी शशिकांत शिंदे मैदानात, समस्यांचा वाचला पाढा, सहकारमंत्री म्हणाले..
'शेतीसाठी 24 तास वीज असल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची तेलंगणात शेती खरेदी'
'Sharad Pawar: लोकांना अजूनही मी शेती खात्याचा मंत्री असल्यासारखे वाटते, पण मी मंत्री नाही'
Share your comments