पुणे: देशात रब्बी हंगामातील पिके वाढीच्या अवस्थेत आहेत काही ठिकाणी रब्बी हंगामातील पिकांची काढणी देतील सुरू आहे तर काही ठिकाणी रब्बीची पिके अंतिम टप्प्यात आहेत. मात्र अशातच पुणे जिल्ह्यातून शेतकऱ्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे, जिल्ह्यातील पाटस येथे महावितरणचा निर्दयी स्वभाव समोर आला आहे. महावितरणने परिसरातील विद्युत ट्रांसफार्मर बंद केले असल्याने शेतकऱ्यांचा शेतीपंपासाठी आवश्यक विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. म्हणूनच शिवारातील शेतकऱ्यांनी महावितरणवर प्रचंड रोष व्यक्त केला आहे. सध्या राज्यात सर्वत्र पारा कमालीचा चढला आहे, म्हणून तापमानात मोठी वाढ नमूद करण्यात आली आहे, पाटस परिसरात देखील उन्हाचे चटके तीव्र झाले आहेत. सध्या रब्बी हंगामातील पिके जोरदार वाढीत आहेत आणि तापमानात देखील दिवसेंदिवस वाढ होत आहे त्यामुळे पिकांना पाणी देणे अनिवार्य झाले आहे मात्र महावितरणच्या या निर्दयी कारभारामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान होत आहे.
वेळेवर पिकांना पाणी न मिळाल्यास पिके करपून जातील असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने फुलवलेले सोन्यासारखे पीक मातीमोल होणार असल्याचे चित्र परिसरात बघायला मिळत आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात नगदी पिकांची लागवड केली जाते, शेतकऱ्यांनी कलिंगड, खरबूज, टरबूज, पालेभाज्या या अल्प कालावधीत काढण्यासाठी सज्ज होणाऱ्या या पिकांची लागवड केली आहे. याशिवाय परिसरातील अनेक शेतकरी फळबाग लागवड करतात यामध्ये प्रामुख्याने द्राक्ष आणि डाळिंबाचा समावेश असतो. परिसरातील शेतकरी बांधवांनी आत्तापर्यंत या पिकांची मोठ्या कष्टाने जोपासना केली आहे. परिसरातील अनेक पिके आगामी काही दिवसात काढणीला तयार होतील, आणि शेतकरी बांधवांना या पिकातून चांगल्या दर्जेदार उत्पादनाची आशा देखील आहे.
सध्या उन्हाचा कडाका वाढला असल्याने रब्बी हंगामातील पिकांना जास्तीच्या पाण्याची आवश्यकता भासत आहे आणि अशा नाजूक प्रसंगी महावितरणने ज्या शेतकऱ्यांनी विज बिल थकवली आहेत तेथील ट्रान्सफॉर्मर्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचा शेतीपंपाचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. महावितरणच्या या निर्णयामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान होत असल्याचे सांगितले जात आहे. रब्बी हंगामातील पिकांना आता पाण्याची नितांत गरज आहे आणि अशातच महावितरणच्या या कार्यवाहीमुळे शेतकऱ्यांची कुचंबणा होत असल्याचे सांगितले जात आहे. रब्बी हंगामातील पिकांना आता पाणी कसे भरायचे असा प्रश्न परिसरातील शेतकऱ्यांच्या पुढे उभा राहिला आहे.
जर अशीच परिस्थिती कायम राहिली तर रब्बी हंगामातील पिके पूर्णता करपून जातील आणि यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागू शकतो. शेतकऱ्यांच्या मते, शेतकऱ्यांना कुठल्याच प्रकारची पूर्वसूचना न देता अशा हिटलरशाहीने ट्रान्सफॉर्मर बंद करणे लोकशाही देशातील कृत्य नव्हे, महावितरणने ट्रान्सफॉर्मर बंद करण्यापूर्वी शेतकऱ्यांना नोटीस बजावणे आवश्यक आहे तसेच शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यासाठी मुदतवाढ देणे देखील अनिवार्य आहे.
Share your comments