सर्वोत्कृष्ट संसदीय कामकाजासाठी चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन व प्रीसेन्सच्या वतीने देण्यात येणारा संसद महारत्न आणि संसद विशिष्टरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. श्रीनिवासन आणि प्रियदर्शिनी राहूल यांच्या हस्ते त्यांनी हा पुरस्कार स्विकारला.
यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून सलग तिसऱ्यांदा मला लोकसभेत पाठविले. त्यांचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी सतत प्रयत्न करीत असते. हा पुरस्कार माझ्या मतदारसंघातील व महाराष्ट्रातील प्रत्येकाचा आहे.
या सर्वांचे मनापासून आभार. यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने माझ्यावर विश्वास ठेवून मला संधी दिली. याबद्दल पक्षाचे तसेच माझ्या संसदीय कामकाजात माझ्यासोबत असणारे माझे सहकारी, संसदेतील स्टाफ आदी सर्वांचे मनापासून आभार, असेही त्यांनी म्हटले आहे.
तसेच आपण माझ्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी सदैव काम करीत आहे. दरम्यान दिल्लीत हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. यामुळे त्यांच्यावर सध्या कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या;
ब्रेकिंग! नितीन गडकरींची मोठी घोषणा, शहरातील टोल होणार रद्द, सर्वसामान्यांना मोठा दिलासा
ब्रेकिंग! यंदा उसाला मिळणार 3 हजार 50 रुपयांची FRP, शेतकऱ्यांना मोठा दिलासा
खासदारांकडून टाळ्यांचा कडकडाट, सभापतींकडून कौतूक, खासदार हरभजन सिंगने केला महत्वाच्या मुद्दा उपस्थित
Share your comments