1. बातम्या

संसदेत 'दूध पे चर्चा'; उसाप्रमाणं एफआरपी लागू करण्याची मागणी

नवी दिल्ली- देशभरातील शेतकऱ्यांना वरदान ठरलेला जोडव्यवसाय म्हणजे दुग्धोत्पादन. मात्र, दूध भावाच्या चढ-उतारामुळे उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे उसाप्रमाणे दूधाला वर्षभर प्रतिलिटर 32 रुपये शाश्वत व स्थिर भाव देण्याची मागणी शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी थेट लोकसभेत केली.

ललिता बर्गे

विविध मुद्द्यांवरुन संसदेत रणकंदन सुरू असताना खासदार लोखंडे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नामुळे 'दूध पे चर्चा' घडून आली. केंद्रीय दुग्धविकास मंत्रांनी प्रश्नाला उत्तर देताना केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट केली आणि विविध दुग्धविकासाच्या योजनांचा आढावा घेतला.
ग्रामीण अर्थकारणाचा मुख्य केंद्रबिंदू असलेल्या दुग्धव्यवसाला बळकटी देण्यासाठी स्थिर भाव असणे महत्वाचे आहे.त्यामुळे साखरप्रमाणे दूधाला एफआरपी मिळाल्यास दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी जीवनदायिनी स्वरुपाचा निर्णय ठरेल.

राज्यातील जवळपास एक कोटी लोकसंख्या या व्यवसायाशी निगडित आहे. हजारो कोटींची उलाढाल या व्यवसातून होते. प्रकियाजन्य दूध उत्पादनांची मागणीही अलीकडच्या काळात वाढली आहे. त्यामुळं दुग्धव्यवसायात सहकारासोबत खासगी क्षेत्राचा सहभागाचा टक्का वाढला आहे. आकडेवारीनुसार खासगी दूध संकलनाचा वाटा ७० टक्क्यांवर पोहोचला असून सहकारी दूध डेअरीमार्फत ३० टक्क्यांचे संकलन केले जाते.उत्पादक शेतकऱ्यांना खर्च रकमेपेक्षा कमी रक्कम त्यांच्या पदरात पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना संजीवनी ठरलेला व्यवसाय तोट्याचा ठरत आहे. त्यामुळे आर्थिक चक्र बिघडले आहे.

दूधाचे अर्थकारण:

प्रतिलिटर उत्पादन खर्च: २७ रुपये
प्रतिलिटर भाव : २२ ते २५
प्रतिलिटर तोटा : २-५ रुपये

English Summary: MP Sadashiv lokhande demands hike FRP for milk Published on: 05 August 2021, 11:16 IST

Like this article?

Hey! I am ललिता बर्गे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters