Mumbai Farmers Protest News :
मंत्रालयातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या आवारात पहिल्या माळ्यावर असलेल्या जाळीवर काही शेतकऱ्यांनी उड्या मारल्या आहेत. कुणीही उडी मारुन आत्महत्या करु नये यासाठी जाळी लावण्यात आली आहे. या जाळीवर अमरावती काही शेतकऱ्यांनी उड्या मारत आंदोलन केले आहे.
आपल्या मागण्यांकडे सरकारकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत आंदोलकांनी आज (दि.२९) थेट मंत्रालय आंदोलन केले आहे. धरणग्रस्तांच्या प्रश्नावर सरकार गंभीर नाही, असा आरोप देखील आंदोलकांनी केला आहे.
अमरावती जिल्ह्याच्या मोर्शी येथे अप्पर वर्धा धरण आहे. या धरण परिसरातील धरणग्रस्तांकडून आज थेट मंत्रालयात आंदोलन करण्यात आलं. या धरणग्रस्तांचं मागील अनेक वर्षापासून आंदोलन सुरु आहे. पण अद्यापही या आंदोलकांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे आंदोलकांनी आज थेट मंत्रालयात आगळ्यावेगळ्या पद्धतीचं आंदोलन सुरु केलं.
अप्पर वर्धा कृती समितीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले आहे. तर या आंदोलनकर्त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न मंत्रालयात उपस्थित असलेल्या पोलिसांकडून करण्यात आला आहे. आम्ही अनेक दिवसांपासून निवेदन देत असून आमच्या मागण्या अजून मान्य होत नसल्याचं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.
Share your comments