1. बातम्या

राज्यभरातील 21 जिल्ह्यांमध्ये दूध संघाचे विरोधी आंदोलन

KJ Maharashtra
KJ Maharashtra
milk movement

milk movement

 कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉक डाऊन गैर फायदा घेऊन शेतकऱ्यांच्या दुधाचे भाव पाडल्याने राज्यभरात दूध संघाच्या विरोधात कारवाई करावी. या मागणीसाठी महाराष्ट्रातील एक जिल्ह्यांमध्ये काल 17 जून रोजी आंदोलन झाले. या आंदोलनाचे नेतृत्व हे अखिल भारतीय किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने  केले. या झालेल्या आंदोलनाला अख्ख्या राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. राज्यातील जवळजवळ 15 जिल्ह्यांमध्ये संबंधित तहसील कार्यालयावर मोर्चा काढून व निवेदने देऊन दूध व इतर शेतकरी प्रश्नांसाठी आंदोलन करण्यात आले.

 या बाबतीत बोलताना दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने म्हटलं की, लॉक डाऊन च्या काळात मागणी घटल्याचा उगीच बाऊ करत ज्या खासगी व सहकारी दूध संघांनी दूध खरेदीच्या दर पाडले सर्व दूध संघाचे ऑडिट करा, प्रत्यक्षात दुधाची मागणी किती घटली होती व त्या प्रमाणात किती दर कमी देण्यात आले याबाबत संपूर्ण चौकशी करावी या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन शेतकऱ्यांचे लूटमार करणाऱ्या खाजगी व सहकारी दूध संघावर कठोरातील कठोर कारवाई करा व केलेली लूटमार वसूल करून ती शेतकऱ्यांना परत करा.

 या आंदोलना प्रसंगी शेतकऱ्यांचे प्रमुख मागण्या

लॉकडाउन लागण्या अगोदर बसलेला प्रति लिटर 35 रुपये दर तातडीने सुरु करावा. आगामी काळात दूध उत्पादकांची लूटमार करता येणार नाही यासाठी खाजगी व सहकारी दूध संघांना लागू होईल आता लूटमार विरोधी कायदा करावा. साखर व्यवसायाप्रमाणे दूध व्यवसायाला किमान आधार भावासाठी एफ आर पी व शिल्लक मिळकतीत  हक्काचा वाट यासाठी रेव्हेन्यू शेअरींग असे कायदेशीर दुहेरी संरक्षण लागू करा.

अनिष्ट ब्रँड वार रोखण्यासाठी एक राज्य एक ब्रँड धोरण स्वीकारा. दूध भेसळ बंद करा. भेसळ  विरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी करून ग्राहकांना शुद्ध दूध रास्त दरात उपलब्ध होईल याची कायदेशीर हमी द्या, या प्रमुख मागण्या या वेळी करण्यात आल्या.

 अहमदनगर, सांगली, कोल्हापूर, पुणे, ठाणे, बीड, वर्धा, यवतमाळ, नासिक, बुलढाणा, सोलापूर, नांदेड, औरंगाबादसह राज्यातील 21 जिल्ह्यांमध्ये आंदोलन संपन्न झाले. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याचे अंबड व कोतुळ येथे परिसरातील शेतकऱ्यांनी दूध संकलन केंद्रावर तीव्र निदर्शने करत सरकारचा दुधाचा अभिषेक घातला दुपारी अकोले तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters