1. बातम्या

''शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी'', कृषी जागरण आणि HDFC बँक यांच्यात सामंजस्य करार

शेतकरी आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी कृषी जागरणची स्थापना करण्यात आली आहे. ज्यासाठी कृषी जागरण वेळोवेळी शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक मोठी पावले उचलते. या मालिकेत आज 23 मार्च रोजी कृषी जागरणने एचडीएफसी बँकेसोबत शेतकऱ्यांच्या भल्यासाठी, कृषी क्षेत्रातील उत्तम बँकिंग सुविधांसाठी सामंजस्य करार केला.

MoU between Krishi Jagran and HDFC Bank

कृषी जागरण के.जे.चौपाल दररोज आयोजित करत आहे. ज्यामध्ये कृषी क्षेत्राशी निगडित मान्यवर किंवा प्रगतीशील शेतकरी नक्कीच भेटायला येतात. अशा परिस्थितीत, HDFC बँकेचे अनिल भवनानी (HDFC, राष्ट्रीय प्रमुख अर्धशहरी आणि ग्रामीण), वंदिता शिवेली (HDFC राष्ट्रीय प्रमुख), अनुराग कुचाळ (HDFC, क्षेत्रीय ग्रामीण प्रमुख) यांनी या कार्यक्रमादरम्यान उपस्थित होते.

याप्रसंगी कृषी जागरणचे मुख्य संपादक डॉमिनिक आणि संपूर्ण टीमने एचडीएफसी टीमचे मनापासून स्वागत केले आणि सन्मानाचे प्रतीक म्हणून रोपटे दिले. कृषी जागरणचे संपादक एम.सी. डॉमिनिक यांनी कृषी क्षेत्राच्या सुधारणेसाठी HDFC बँकेसोबत सामंजस्य करार केला.

वंदिता शिवेली (HDFC National Lead)

वंदिता शिवेली (HDFC National Lead)

या सामंजस्य करारावर (एमओयू) स्वाक्षरी करण्याचा उद्देश कृषी समुदाय, कृषी कॉर्पोरेट आणि संबंधित क्षेत्रांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी 'शेतकरी-केंद्रित टॉक शो' प्रदान करणे आहे. यासोबतच शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या प्रत्येक योजना प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत नेण्याचे काम करणार आहे.

कृषी जागरण आणि HDFC बँक यांच्यात सामंजस्य करार

कृषी जागरण आणि HDFC बँक यांच्यात सामंजस्य करार

कृषी जागरणच्या केजे चौपाल मंचचे अनिल भवनानी म्हणाले की, आम्ही प्रत्येक गावात एचडीएफसी शाखा उघडू शकत नाही, परंतु कृषी जागरण देशातील प्रत्येक गावात शेतकऱ्यांना बँक सुविधा देण्यासाठी कार्यरत आहे. आमच्या या सामंजस्य करारामुळे आता शेतकर्‍यांसाठी बँकिंग कामकाज सोपे होणार आहे. 31 मार्चपर्यंत आमच्या HDFC च्या 10,000 शाखा पूर्ण होतील आणि विशेष म्हणजे आमच्या 51 टक्के शाखा (सेमी अर्बन रुरल) सेमी अर्बन रुरलमध्ये आहेत. यासोबतच कृषी जागरणने शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामाचेही त्यांनी कौतुक केले.

कृषी जागरण आणि HDFC बँक यांच्यात सामंजस्य करार

कृषी जागरण आणि HDFC बँक यांच्यात सामंजस्य करार

शेवटी कृषी जागरणचे सीओओ डॉ. पीके पंत यांनी एचडीएफसीच्या संपूर्ण टीमचे आभार मानले आणि कृषी जागरण आणि एचडीएफसी बँक यांच्यातील सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्याबद्दल अभिनंदन केले.

अनिल भवनानी (HDFC, National Head Semi Urban & Rural)

अनिल भवनानी (HDFC, National Head Semi Urban & Rural)

HDFC

HDFC

English Summary: MoU between Krishi Jagran and HDFC Bank to "Improve Farmers' Economic Status" Published on: 22 March 2023, 10:57 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters