1. बातम्या

सरकारच्या या योजनेच्या मदतीने राज्यातील एक हजार पेक्षा जास्त शेतकरी उत्पादक कंपन्या बनल्या स्मार्ट

शेती आणि शेतीशी संबंधित क्षेत्राला विविध प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करताना दिसत आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
farmer producer orgnization

farmer producer orgnization

शेती आणि शेतीशी संबंधित क्षेत्राला विविध प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करताना दिसत आहे.

याच दृष्टिकोनातून राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रोत्साहन मिळावे याकरिता कृषी विभागाच्या आत्मा योजनेअंतर्गत प्रकल्प अहवाल सादर करण्यासाठी राज्यातील 1432 शेतकरी उत्पादक कंपन्या पात्र ठरले आहेत.बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय ग्रामीण परिवर्तन प्रकल्पअंतर्गत राज्यातील चार हजार 429 कंपन्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता. परंतु यामध्ये काही कंपन्या पात्र झाले असून सर्वाधिक कंपन्या नगर जिल्ह्यातील आहेत.या योजनेच्या माध्यमातून शेतीवर आधार मूल्य साखळी विकसित पाण्यासाठी भर दिला जातो.

या योजनेचा उद्देश

शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून सामूहिक शेती व पूरक व्यवसायांची निर्मिती करणे, तसेच बाजार संपर्क वाढवणे हे दोन महत्त्वाचे उद्दिष्ट आहेत. यामध्ये अशी अट  आहे की एका शेतकरी उत्पादक कंपनी मध्ये कमीत कमी दोनशे पन्नास शेतकरी यांचा सहभाग असणे महत्वाचे आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपनी च्या प्रकल्पासाठी कंपनीला दहा कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे व त्यावर 60 टक्के अनुदान राहणार आहे.

त्यामुळे संबंधित कंपन्यांना सामूहिक व्यवस्थेची उभारणी करता येणे शक्य होणार आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत राज्यातील 1432 कंपन्या पात्र ठरले असून त्या कंपन्यांना प्रकल्प प्रस्ताव सादर करण्याची परवानगी देण्यात आली आहे.बाकीचा इतर कंपन्या या परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत.

English Summary: more than one thousand fpo become smart through smaart scheme Published on: 09 February 2022, 01:21 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters