महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्ज मुक्त करण्यासाठी शासनाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राज्यात राबवित आहेत. या योजनेमुळे शेतकऱ्यांना निश्चितच दिलासा मिळाला आहे. या योजनेच्या अंमलबजावणीमुळे शेतकऱ्यांवर चा कर्जाचा भार हा कमी झाला असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
या योजनेचा अंमलबजावणीबाबत बुलढाणा जिल्ह्याचा विचार केला तर या जिल्ह्यात कर्ज मुक्ती योजनेची प्रभावीरित्या अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेनुसार 1 एप्रिल 2015 पासून ते 30 सप्टेंबर 2019 पर्यंत थकित असलेले व्याजासह मुद्दल दोन लाख रुपये पीक कर्ज माफ करण्यात आले आहे. बुलढाणा जिल्ह्यात या योजनेअंतर्गत एक लाख 72 हजार 532 खातेधारक लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1139.77 कोटी रुपये त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत.
त्यामुळे शेतकऱ्यांवरील असलेले कर्जाचे ओझे निश्चितच कमी झाले असून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे. शासनाच्या या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी आधार क्रमांक हा महत्त्वाचा असून शेतकऱ्यांना त्याशिवाय कुठल्याही कागदपत्रे जमा न करता सहज रित्या या योजनेचा लाभ मिळत आहे.
या योजनेनुसार शेतकऱ्यांना आपल्या जवळच्या महा-ई-सेवा केंद्र मध्ये जाऊन ज्या शेतकऱ्यांचे कर्ज मुक्ती लाभार्थ्यांच्या यादीत नाव आहे अशांनी आधार प्रमाणीकरण करावयाचे होते.
अशाप्रकारे बुलढाणा जिल्ह्यात एक लाख 76 हजार 33 शेतकऱ्यांनी आपली खाती आधार प्रमाणीकरण केले. त्यापैकी एक लाख 72 हजार 532 कर्जदार खातेधारकांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आला आहे. उरलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचालाभ देण्याची प्रक्रिया सुरू आहे. शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेच्या सहायाने शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचे ओझे हलके होत शेतकरी पुन्हा जोमाने जास्तीचे उत्पादन घेण्यासाठी तयार झाले आहेत.
Share your comments