शेतकऱ्यांनी मागील संकटांचे मालिकाही संपता संपत नाही.कधी अवकाळी पाऊस तर कधी ढगाळ वातावरणामुळे अगोदरच त्रस्त झालेल्या शेतकर्यांना पुन्हा अवकाळी पावसाला सामोरे जावे लागत आहे. वातावरणातील बदलाचा फटका सर्व हंगामातील पिकांना बसला आहे.
खरिपाचे तर अतोनात नुकसान झाले होते त्या संकटातून सावरून शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची तयारी सुरू केली होती परंतु पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांपुढेसंकट आ वासून उभी आहे. याचा फटका फळबागांना मोठ्या प्रमाणात बसत आहे.
जर आपण फळबागांचा विचार केला तर फळबागा आता अंतिम टप्प्यात असतानाच अवकाळी पावसाने आणि बदलत्या वातावरणाने त्यांच्यावर विपरीत परिणाम झाला आहे. त्यासोबतच आता रब्बी हंगामा वरही अवकाळी पावसाचा आणि ढगाळ वातावरणाचा परिणाम होत आहे. मुंबई तसेच कोकणविभागातील रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावल्याने फ्लॉवर, कांदा आणि द्राक्ष सारख्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे त्यासोबतच रोगांचे प्रमाणही वाढले.
जर नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर नाशिक जिल्ह्यात आज सकाळपासूनच पाऊस सुरू असून पडणारा पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे द्राक्षबागा संकटात सापडल्या आहे.टोमॅटोचे पीक आता बहारात असताना त्यांच्या हातात चांगला पैसा येण्याची आशा होती, परंतु या अवकाळी पावसामुळे टोमॅटो खराब होत आहे. या अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत असून कांदा वाचवण्यासाठी महागड्या औषधांची फवारणी करावी लागत आहे.
तसेच परिस्थिती तूर या पिकाचे असून तूर पिक आता फुलोरा अवस्थेत आहे तर कुठे शेंगा लागण्याच्या अवस्थेत असताना त्या बदलत्या हवामानाचा प्रभाव तुरीवर झाला आहे. तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता सुद्धा वाढले आहे. तसेच सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात अधून मधून पाऊस पडत आहे त्यामुळे आंबा आणि काजू पिकावर त्याचा परिणाम झाला आहे. या वातावरणाचा फटका आंब्याला बसला असून आंबा पिकावर तुडतुडे आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे.
Share your comments