ऊसाचा हंगाम अंतिम टप्यात आहे. ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांना एकरी 5 हजार ते 20 हजार रुपये मोजावे लागत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी सावकारांकडून व्याजाने पैसे घेऊन मुकादामांना दिले आहेत. शेतकरी संकटात सापडला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते प्रवक्ते व सांगली जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी सागिउटले की, सर्व शेतकऱ्यांचे पैसे परत मिळावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तोडीसाठी दिलेली रक्कम शेतकऱ्यांना परत करावी अन्यथा ऊस बिलातून तोडीची रक्कम वजा करावी अन्यथा साखर कारखानदारांच्या विरोधात बेमुदत संपावर जाण्याचा जिल्हाध्यक्ष महेश इशारा खराडे यांनी दिला आहे. यासंदर्भात आम्ही साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना निवेदन दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
राज्यात एकीकडे पाऊस तर दुसरीकडे उष्णतेची लाट; आज 'या' ठिकाणी पावसाचा इशारा
शेतकऱ्यांचा नाद नाही करायचा..! थेट पीक विमा कंपनीलाच शिकवला धडा; जाणून घ्या काय आहे प्रकरण
मुकादम, चालक, मशिन मालक यांच्याविरुद्ध तक्रार करण्यासाठी शेतकऱ्यांना पुढे यावे लागते. त्यासाठी ज्या कारखान्याकडे ऊस गेला त्या कारखान्याचे नाव, शेतकऱ्याचे नाव, गावाचे नाव, मुकादमचे नाव, गावाचे नाव, चालकाचे नाव, अशी तपशीलवार माहिती. मशीन मालकाचे नाव गोळा करायचे आहे. याप्रकरणी संबंधित साखर कारखाना व साखर आयुक्तांकडे तक्रार करावी, असेही खराडे म्हणाले.
कौतुकास्पद ! भारताचा कृषी क्षेत्रात नवा विक्रम; बातमी वाचून तुम्हांलाही वाटेल अभिमान
शेतकऱ्यांकडून घेतलेले पैसे परत करा, एकाच कामासाठी शेतकऱ्यांना दुबार पैसे द्यावे लागत आहेत. काम एकदा आणि पैसे दोनदा. एकतर कपात बंद करा किंवा कामगार बिलातून कपात करा, असे खराडे म्हणाले. याबाबत तक्रार करून मोबदला देण्याचे आश्वासन साखर आयुक्तांनी दिल्याचे महेश खराडे यांनी सांगितले.
कापणीचे पैसे कापूनही साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांना पुन्हा तोडणीसाठी पैसे द्यावे लागत असतील. ऊस तोडणीसाठी सुरू असलेली दुहेरी लूट थांबविण्यासाठी शेतकऱ्यांनी सज्ज व्हावे. प्रथम साखर कारखानदारांकडे तक्रार करण्यात येईल, त्यानंतर प्रत्येक कारखान्यावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा खराडे यांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
Smartphone and Tablet: 10 लाख तरुणांना मिळणार मोफत स्मार्टफोन आणि टॅबलेट; असा घ्या लाभ
Business Idea : फक्त 10-15 हजार रुपयांत सुरू करा 'हा' व्यवसाय, कमी वेळात लाखोंची कमाई
Share your comments