
Monsoon will arrive after June 10 (image google)
सध्या देशात सर्व शेतकऱ्यांचे लक्ष हे मान्सूनकडे लागले आहे. असे असताना आता देशात यंदा मान्सून उशीरा दाखल होणार आहे. गेल्या २४ तासांत अरबी समुद्राच्या दक्षिण किनार्यावर चक्रीवादळ निर्माण झाले आहे.
त्यामुळे अद्याप मान्सून केरळातच दाखल झालेला नाही. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून ४ जूनपर्यंत केरळमध्ये पोहोचेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. पण तसे झाले नाही.
सुरुवातीला तर तो दोन जून रोजीच मोसमी पावसाचे आगमन होईल असेही संकेत होते. परंतु प्रत्यक्षात आता दहा जून नंतरच केरळमध्ये मान्सूनचे आगमन होईल असा नव्याने अंदाज आहे.
कारल्याची शेती आहे फायदेशीर, जाणून घ्या..
दरम्यान, २०१८ नंतर पहिल्यांदाच १० जून नंतर मोसमी पाऊस येतोय. भारतात यंदा अलनिनोची स्थिती असल्याने मोसमी पावसाचा परिणाम होईल, अशी जी सुरुवातीला भीती वाटत होती ती आता आता खरी ठरताना दिसत आहे. आता तरी देखील हवामान खात्याने मात्र पावसाच्या प्रमाणावर काही परिणाम होणार नाही असा अंदाज दिला आहे.
भातशेतीसाठी कशाची गरज? मान्सूनच्या तोंडावर जाणून घ्या सर्वकाही..
२०१८ मध्ये मोसमी पावसाच्या आगमन केरळमध्ये २९ मे रोजी झाले होते. २०२० मध्ये तो एक जून रोजी आला होता. २०२१ मध्ये तो तीन जून रोजी आला होता.
मोठी बातम! बारामतीत शेतकऱ्याने तहसील कार्यालयाच्या आवारात पेटवून घेतले...
उसावरील मर रोगाचे नियंत्रण, जाणून घ्या...
राज्यात कधी आणि कोठे मान्सून दाखल होणार? जाणून घ्या...
Share your comments