यंदाच्या वर्षी राज्यात पावसाने अतिशय उशिराने एन्ट्री मारली. यामुळे अनेक ठिकाणी खूपच कमी पाऊस झाला आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. त्यानंतर पाऊस चांगलाच बरसला. काही दिवस बरसला. त्यानंतर पुन्हा त्याने विश्रांती घेतली. त्यानंतर तो पुन्हा आला.
पण नंतर ऑगस्ट महिन्यात त्याने जी सुट्टी घेतली तो शेवटपर्यंत आलाच नाही. यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढावले. आता पुणे परिसरातून पाऊस कधीपासून परणार आहे? त्याची माहिती पुणे हवामान विभागाने दिली आहे.
देशातही मान्सूनचा हंगाम संपला आहे. तसेच अनेक राज्यात परतीचा पाऊस सुरु झाला आहे. पुणे जिल्ह्यातून आगामी दोन दिवसांत पाऊस परतणार आहे. यामुळे आता पावसाची आशा मावळली आहे.
तसेच राज्यातून आजपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाला असल्याचे पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉ.अनुपम काश्यपी यांनी म्हटले आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाच्या पट्यामुळे पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस होत होता.
आता बंगालच्या उपसागरात बदल झाला असून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. पुणे शहर व जिल्ह्यात यंदा पावसाची तूट होती. मान्सूनच्या चार महिन्यांत आतापर्यंत ६८४.१ मिलिमीटर पाऊस पुणे जिल्ह्यात झाला आहे. पावसाचे हे प्रमाण वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ ७८.९ टक्के आहे.
राज्यात सोयाबीनच्या पिकावर 'येलो मोझ्याकचा प्रादुर्भाव, शेतकरी अडचणीत, सरकारकडून हालचाली सुरू
Share your comments