राज्यात पावसाला पोषक हवामान होत असल्याने मॉन्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. उद्यापासून राज्यात पाऊल सुरु होणार असून कोकण , मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची, विदर्भ मराठवाड्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा हिमालयाच्या पायथ्याकडे सरकला आहे. तर पश्चिम किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्ट्याचा विस्तार कमी झाल्याने राज्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. तर पाऊस सुरू असलेल्या भागातही जोर कमी झाला आहे.
मात्र १३ जुलैपासून मॉनसूनचा आस दक्षिणेकडे सरकरण्याची शक्यता आहे. यामुळे कोकण किनारपट्टीसह मध्य भारतात पावसाला सुरुवता होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान राजस्थानमध्येही मॉन्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. १३ जुलै ते १५ जुलैपर्यंत पूर्वी राजस्थान आणि १५ जुलैपासून पश्चिमी राजस्थानात पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर मध्य प्रदेशातील १५ जिल्ह्याती मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे. तर बिहारमध्ये अल्रर्ट जारी करण्यात आला आहे. बिहारमध्ये मॉन्सून पूर्णपणे सक्रिय आहे. तेथील मधुबनी, सीतामढी आणि इतर परिसरात विज पडेल अशी शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे. परिसरात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
दरम्यान राज्यात विविध भागात सुरु असलेल्या पावसाने काहीशी उडीप दिली आहे. तर कोकण, घाटमाथा, धरणांच्या पाणलोटात सुरु असलेल्या पावसाचा जोरही ओसरला आहे. शनिवारी पर्यंत कोकणातील काही ठिकाणी तर उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.
Share your comments