1. बातम्या

मॉन्सून करतोय ताशी ६.५ किमीचा प्रवास, दोन दिवसात संपूर्ण राज्य व्यापणार

गुरुवारी तळकोकणात दाख‌ल झालेल्या मान्सूनने शुक्रवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागापर्यंत मजल मारली. गुरुवारी मान्सून सोलापूरपर्यंत आला होता. गेल्या २४ तासांत ताशी ६.४ किमी प्रवास करत मान्सून बीडमध्ये दाखल झाला आहे. हवामान विभागाने गुरुवारी मॉन्सून महाराष्ट्रात दाखल झाल्याची घोषणा केली.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


गुरुवारी तळकोकणात दाख‌ल झालेल्या मान्सूनने शुक्रवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागापर्यंत मजल मारली.  गुरुवारी मान्सून सोलापूरपर्यंत आला होता.  गेल्या २४ तासांत ताशी ६.४ किमी प्रवास करत मान्सून बीडमध्ये दाखल झाला आहे.  हवामान विभागाने गुरुवारी मॉन्सून महाराष्ट्रात दाखल झाल्याची घोषणा केली.  राज्यात मॉन्सून आगमनाची सरासरी तारीख १० जून आहे. यंदा हा प्रवेश एक दिवस उशिराने झाला.  यानंतर आता येत्या  २४ तासात मुंबईत मॉन्सून दाखल होणार आहे. उकाड्यामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना यामुळे दिलासा मिळणार आहे.  येत्या २४ तासात मॉन्सून मुंबईत येईल असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे.   मॉन्सूनचा दक्षिणेकडून  पश्चिमेकडे प्रवास सुरू आहे.  मॉन्सूनचा आतापर्यंत हर्णे, अहमदनगर, औरंगाबाद, गोंदिया येथेपर्यंत प्रवास झाला आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून मॉन्सून चकवा देत होता.   येत्या काही दिवसात मॉन्सून संपूर्ण राज्य व्यापेल, असा अंदाज आहे.

सध्या मान्सूनची उत्तर सीमा हर्णे, बारामती, सोलापूर, वर्धा, रायपूर, संबळपूर अशी असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.  दरम्यान, गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी मराठवाड्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांत जोरदार पाऊस झाला. गुरुवारी मान्सून तळकोकणात दाखल झाला होता.  राज्यात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे.  गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी नगर, कोल्हापूर, नाशिक, पुणे, औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी जिल्ह्यांत जोरदार पाऊस झाला.  दरम्यान देशातील इतर राज्यात मॉन्सून आपली हजेरी लावली आहे.  कर्नाटकचा उर्वरित भाग, संपूर्ण, रायलसीमा, आंध्रप्रदेशचा किनारी भाग, तेलगंणा, छत्तीसगडचा काही भाग, नागालँड, मिझोराम, त्रिपुरा, अशा काही भागात मॉन्सून दाखल झाला आहे.

English Summary: monsoon travel 6.5 km per kilometer , within two days monsoon will spread all over state Published on: 13 June 2020, 04:25 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters