उद्यापासून मॉन्सूनची प्रगती ; 'या' राज्यात होणार मुसळधार पाऊस

09 June 2020 04:52 PM By: भरत भास्कर जाधव


हवामानाने आपले रुप बदलेले आहे, पण बदलेल्या रुपाबरोबर नैसर्गिक संकटही आले आहे.   अम्फान आणि निसर्गाच्या चक्रीवादळानंतर आता परत एका वादळाची शक्यता वर्तवली जात आहे.   बंगालच्या खाडीमध्ये हे वादळ विकसीत होत आहे,  याच्या स्थितीकडे पाहता हवामान विभागाने या वादळाचे नाव गती ठेवले आहे.  दरम्यान हे वादळ अम्फान वादळाच्या तुलनेने कमजोर आहे.  बंगालच्या उपसागरात  तयार होत असलेल्या कमी दाबाचे क्षेत्र नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा वाटचाली पूरक ठरण्याचे संकेत आहेत. 

उद्यापर्यंत मॉन्सून गोव्यासह तळकोकणात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.  निसर्ग चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मॉन्सून यंदा वेळेवर केरळात दाखल झाला आहे.  चक्रीवादळाचा प्रभाव असेपर्यंत मॉन्सूनने पश्चिम किनारपट्टीत वेगाने चाल केली आहे.  गुरुवारी संपूर्ण केरळ, कर्नाटक राज्याची संपूर्ण किनारपट्टी व्यापून मॉन्सून वारे गोव्याच्या उंबरठ्यावर दाखल झाले.  मॉन्सूनने रविवारी सलग दुसऱ्या दिवशी वाटचाल करत मॉन्सूनने कर्नाटकमधील कारवार, सिमोघा, तुमकूर, आंध्रप्रदेशातील चित्तूर आणि तामिळनाडूतील चेन्नईपर्यंत मजल मारली आहे. 

मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक हवामान असल्याने उद्यापर्यंत मध्य अरबी समुद्रा, कोकण, गोवा,  कर्नाटकचा आणखी  काही भागासह ईशान्य भारतातील राज्यांमध्ये मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे.  येत्या २४ तासात अदमान व निकोबार द्वकल्पावर मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.   पुर्वेकडील भारतातील ओडिसा, दक्षिण किनारपट्टीय भागातील आंध्रप्रदेश, केरळ, कर्नाटकातील किनारपट्टी भाग, कोकण व गोवा यासह गुजरातच्या दक्षिण  भागात मध्यम आणि हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्याता आहे.   दरम्यान उत्तर पश्चिम भारताच्या मैदान भागात हवामान कोरडे राहिल. 

Monsoon rainfall heavy rainfall मॉन्सून पावसाळा मुसळधार पाऊस
English Summary: monsoon take off from tomorrow ; heavy rain fall happen in this state

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.