देशात कोरोनाचे संकट उभे टाकले आहे, याच दरम्यान मात्र एक सुखद बातमी आहे. ही बातमी म्हणजे दक्षिण पश्चिम मॉन्सून योग्य दिशेने वाटचाल करत आहे. हवामान विभागाच्या मते रविवारी दक्षिण - पश्चिम मॉन्सूनमध्ये देशात सरासरी ३१ टक्के पाऊस पडला आहे. केंद्रीय जल आयोगानुसार, देशात १२३ मोठे जलाशये असून त्यातील पाणी क्षमता ही मागील वर्षाच्या तुलनेने १७३ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. ग्रामीण भारतासाठी ही चांगली गोष्ट आहे. दरम्यान १२ जूनपर्यंत खरीप पिकांची पेरणी (Kharif sowing) सरासरीने १०.३६ टक्के झाली आहे. देशात यावेळी भाताची पेरणी ही दोन लाख हेक्टरपेक्षा अधिक परिसरात झाली. पेरणीच्या कामासाठी शेतकरी मजुरांना गाडी करून आणत आहेत. पंजाबमधील बरनाला जिल्ह्यातील मोठे शेतकरी पेरणीच्या कामासाठी मजुरांना गाडीतून ने आण करत आहेत.
रविवारी ७० प्रवाशी मजूर बरनाला आल्यानंतर तेथील शेतकऱ्यांना त्यांच स्वागत मोठ्या उत्साहात केले. पंजाबमधील शेती क्षेत्रात साधारण ६ लाख प्रवाशी मजदूर काम करत होते. त्यातील ३.८९ लाख मजदूरांना लॉकडाऊनमुळे आपल्या घरी जावे लागले. दरम्यान हवामान विभागाच्या मते दक्षिण-पश्चिम मॉन्सून आपल्या दिशेत जात आहे. मॉन्सूनचा वाढता जोर पाहता आता पेरणीच्या कामांनीही जोर धरला आहे. कृषी मंत्रालयाच्या माहितीनुसार, या महिन्यात १२ जून पर्यंत खरीप पिकांची पेरणी वाढली आहे. भाताची पेरणी ही ५.५९ लाख हेक्टर क्षेत्रात झाली आहे. ही पेरणी सरासरीच्या मानाने २.२२ लाख हेक्टरने जास्त आहे. डाळींची पेरणीही २.२८ लाख हेक्टर परिसरात झाली आहे. सरासरीच्या मानाने ही पेरणी ०.१७ लाख हेक्टरने कमी आहे. दरम्यान एकूण पिकांची पेरणी ही ७७ लाख हेक्टर पेक्षा जास्त आहे.
Share your comments