सध्या सर्व शेतकऱ्यांचे लक्ष पावसाकडे लागले आहे. सध्या शेतीची कामे पूर्ण करून शेतकरी पावसाची वाट बघत आहे. असे असताना आता दक्षिण अरबी समुद्रासह मालदीव आणि कोमोरीन भागात मॉन्सूनने प्रगती केल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
यावर्षी मान्सूनचे आगमन काहीशे लांबले आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. १ जूनपर्यंत मॉन्सून केरळमध्ये दाखल होत असतो. यंदा आगमन लांबले असून रविवारपर्यंत मॉन्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
दरम्यान, बंगालच्या उपसागराच्या काही भागात मॉन्सून पुढे सरकला आहे. उद्यापर्यंत अरबी समुद्राच्या आणखी काही भाग, बंगालच्या उपसागराचा आणखी काही भागांत मॉन्सूनची प्रगती होण्याची शक्यता आहे.
तूर ११ हजार रुपयांवर, शेतकऱ्यांना दिलासा..
तसेच दक्षिण अरबी समुद्र, मालदीवसह दक्षिण भारत आणि पश्चिम श्रीलंकेलगत असलेल्या कोमोरीन भागात मॉन्सून दाखल झाला आहे. यामुळे मान्सून प्रगती करत असल्याचे दिसून येत आहे.
शेतकरी पिकांवर फवारत आहेत दारु, कारण ऐकून वाटेल आश्चर्य..
यावर्षी दोन दिवस आगोदरच १९ मे रोजी मॉन्सून दक्षिण बंगालचा उपसागर, निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्रात मॉन्सून दाखल झाला. त्यानंतर मॉन्सूनची वाटचाल थांबली होती.
ज्यादा दराने विक्री, बोगस खते विक्री करणे आले अंगलट, नगरमध्ये तीन कृषी केंद्रांचे परवाने निलंबित..
महिंद्राचा हा ट्रॅक्टर सर्वात शक्तिशाली! आधुनिक आणि प्रगत सुविधांनी सुसज्ज
ऑक्सिटोसिन वापरून दुधात भेसळ, गाय आणि म्हशीच्या दुधाचे प्रमाण वाढवण्यासाठी ऑक्सिटोसिन नावाच्या औषधाचा अवैध वापर
Share your comments