हिंदू धर्मातील (Hinduism) साडेतीन मुहूर्तापैकी गुढीपाडवा (Gudi Padawa) एक पूर्ण मुहूर्त मानला जातो. गुढीपाडवा हा सण विजयाचे प्रतिक म्हणून साजरा केला जातो. देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी अनेक नावांनी, सांस्कृतिक श्रद्धा आणि उत्सवाच्या रुपात हा दिवस साजरा केला जातो. महाराष्ट्रात या दिवशी सूर्योदयानंतर घरासमोर गुढी उभारून तिची पूजा केली जाते.
गुढीपाडव्याचे महत्व Importance of Gudi Padawa
गुढीपाडवा सण साजरा करण्यामागे अनेक श्रद्धा आहेत. या दिवशी मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम 14 वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत (Ayodhya) परत आले होते आणि त्याच्या स्मरणार्थ गुढीपाडवा साजरा केला जातो अशी एक धार्मिक श्रद्धा आहे. तर या दिवशी ब्रह्म देवाने विश्वाची निर्मिती केली होती अशी देखील अशी धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे गुढीला ब्रह्मध्वज देखील मानले जाते.
महत्त्वाच्या बातम्या :
रशिया-युक्रेन युध्दामुळे शेतकरी होणार मालामाल; 'या' शेतीमालाच्या मागणीत वाढ
Gudi Padwa 2022: गुढी पाडव्याला आहे खास महत्त्व; जाणून घ्या या दिवसाचं वैशिष्ट
अतिरिक्त ऊसाबाबत साखर आयुक्तांनी घेतला महत्त्वाचा निर्णय; शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा
शेतकरी यांचं जिव्हाळ्याचे नातं
मराठी नववर्षाच्या याच दिवसापासून शेतकऱ्यांचेही शेती व्यवसयातील नववर्ष सुरु होते. रब्बी हंगाम (Rabbi season) अंतिम टप्प्यात असतानाच या नववर्षीची सुरवात केली जाते. काळाच्या ओघात शेती व्यवसयामध्ये अमूलाग्र बदल झाला आहे. या काळात शेतकऱ्यांनी काही परंपरा या बदलत्या वातावरणामध्येही कायम ठेवलेल्या आहे.
एका प्रथेनुसार पेरणी झाल्यावर रब्बी पीक काढल्याच्या आनंदात शेतकरी हा सण साजरा करतात आणि गुढीपाडव्याच्या दिवशी चांगले पीक यावे या उद्देशाने शेतकरी शेतात नांगरणी करतात अशी देखील मान्यता आहे.
Share your comments