
Mohit kamboj rohit pawar
मोहित कंबोज यांनी पूर्वी सांगितल्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी, बारामती ॲग्रो लिमिटेड कंपनीचा मी सखोल अभ्यास करतोय. त्या संदर्भातील अधिकचे अपडेट लवकरच देईल, असे ट्विट कंबोज यांनी केले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.
राज्यात सध्या अनेक नेत्यांची चौकाशी सुरू आहे. तसेच अनेक नेते जेलमध्ये गेले आहेत. असे असताना काही दिवसांपूर्वी मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादीला इशारा दिला होता. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यानंतर राष्ट्रवादीचा आणखी एक बडा नेता अडचणीत येणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.
त्यानंतर आज त्यांनी हे ट्विट केले आहे. कंबोज यांनी काही दिवसांआधी इशारा केलेला ‘राष्ट्रवादीचा बडा नेता’ रोहित पवार आहेत का? असा प्रश्न विचारला जात आहे. यामुळे आता रोहित पवार अडचणीत येणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
माझं हे ट्विट सेव्ह करुन ठेवा! अनिल देखमुख, नवाब मलिकांपाठोपाठ आता राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याची बारी आहे. लवकरच हा नेता मलिक, देशमुखांच्या भेटीला जाणार आहे. तेव्हा जेलवारीसाठी तयार राहा!, असं सूचक इशारा देणारं ट्विट मोहित कंबोज यांनी केलंय. हर हर महादेव! अब तांडव होगा!, असंही ट्विट त्यांनी केलंय. यामुळे आता काय होणार हे लवकरच समजेल.
टोळ्यांनी फसवलं!! ऊसतोड कामगारांकडून तब्बल 39 कोटी रुपयांची फसवणूक, धक्कादायक आकडेवारी आली समोर
त्यांनी आज एक ट्विट करत रोहित पवार तो पुढचा नेता असू शकतो, असा इशारा दिला आहे. अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय पांडे, संजय राऊत यांच्या नंतरची जागा रिकामी करत ही गाळलेली जागा लवकरच भरली जाईल, असे सांगितले आहे. यामुळे रोहित पवारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या;
'खाऊन 50 खोके माजलेत बोके, ईडी ज्याच्या दारी तो भाजपच्या दारी'
ब्रेकिंग! महाराष्ट्रातल्या भाजपच्या माजी खासदाराचा आपमध्ये प्रवेश, केजरीवाल यांचे मिशन महाराष्ट्र सुरू
शेतकऱ्यांचा आर्थिक कणा असलेल्या जिल्हा बँका राज्य बँकेत विलीन होणार? मोदी सरकारचा निर्णय
Share your comments