पुणे : देशातील शेतकरी अडचणीत असताना, मोदी सरकारने अमेरिकेवरून दुग्ध उत्पादनांसाठी भारतीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आगोदरच देशोधडीला लागलेला शेतकरी भिकेला लागण्याची शक्यता आहे.
शेती फायद्याची नाही म्हणून सरकार शेतकऱ्यांना कृषिपूरक व्यवसाय करायला सांगते. देशात दूध व्यवसाय शेतींनंतरचा सर्वात मोठा व्यवसाय आहे. करोडो शेतकऱ्याचे जीवन या व्यवसायावर अवलंबून आहे. टाळेबंदीमुळे दुधाची आणि इतर उत्पादनाची मागणी कमी झाली आहे. तसेच दुधाच्या भुकटीचा हजारो टनाचा साथ पडून आहे. यातच देशात ठिकठिकाणी विशेषतः महाराष्ट्रात दूधदरवाढीसाठी आंदोलने सुरु आहेत. यावर कडी करणारा निर्णय म्हणजे आम्रिकेतून दुग्ध उत्पादनाची आयात करणे होय.
अमेरिकेसारख्या देशात शेतीवर मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जाते. त्यामुळे तेथील कोणतीही कृषी उत्पादने आंतरराष्ट्रीय बाजरात स्वस्त होतात. आपला माल यह मालाच्या तुलनेत महाग होतो. त्यामुळे गिर्हाईक मिळत नाही. जर भारतात हि उत्पादने आली तरी देशातील दूध उद्योग संकटात येईल असे सर्व जाणकारांचे म्हणने आहे.
Share your comments