देशातील शेती क्षेत्रात काळाच्या ओघात आता नवनवीन बदल बघायला मिळत आहेत. देशातील शेती क्षेत्र आता आधीच्या तुलनेत हायटेक बनत चालले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात तसेच शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यात मदत होत चालली आहे. सध्या मोबाईलचा प्रत्येक क्षेत्रात मोलाचा वाटा बघायला मिळत आहे. शेतीत देखील मोबाईलचा वाटा आता प्रकर्षाने दिसू लागला आहे.
मोबाईलचा वापर करीत शेतकरी बांधवांना शेती करणे अधिकच सोपे झाले आहे. आता देशातील मोदी सरकार देखील शेतकऱ्यांच्या सोयीसाठी एक विशिष्ट असे मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या लॉन्च होऊ घातलेल्या एप्लीकेशन मध्ये शेतकरी बांधवांना सर्व सुविधा दिल्या जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
या अप्लिकेशन मध्ये पिकासंदर्भात माहिती, हवामानाचा अंदाज, पीक काढणीनंतर करावयाचे नियोजन, बाजारपेठेतील लेटेस्ट अपडेट इत्यादी बाबींचा समावेश असणार आहे. यामुळे निश्चितच शेतकरी बांधवांना मोठा फायदा होणार असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.
या एप्लीकेशन मध्ये याव्यतिरिक्त देखील अनेक गोष्टींचा समावेश केला जाणार आहे. यामध्ये शासनाकडून दिल्या जाणाऱ्या योजना, शासनाकडून दिल्या जाणाऱ्या घोषणा आणि ऍडव्हायझरी याबाबत देखील या अप्लिकेशन मध्ये सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी केंद्रीय कृषी विभागामार्फत जोमात काम सुरू आहे. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की याआधी देखील सरकारने शेतकऱ्यांकडे असलेल्या मोबाईलची उपलब्धता ओळखता अनेक प्रकारच्या एप्लिकेशन्स लॉन्च केल्या आहेत.
मात्र सदरच्या एप्लीकेशन एका विशिष्ट विषयाशी निगडित असल्याने शेतकरी बांधवांना वेगवेगळ्या विषयासंदर्भात वेगवेगळ्या ॲप्लिकेशन ठेवाव्या लागतात. यामुळे शेतकरी बांधवांना वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळ्या अप्लिकेशन वापरण्याऐवजी एकच ॲप्लिकेशनची उपलब्धता करून दिली जावी असा सरकारचा मानस आहे. सरकार वेगवेगळ्या एप्लीकेशनचे फीचर्स एकत्र करत एक सुपर ॲप डेव्हलप करणार आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, या अँप्लिकेशन मध्ये शासनाच्या सर्व योजनांची माहिती, पिकांची माहिती, हवामानाचा अंदाज, बाजारपेठेतील बाजार भाव, कृषी संबंधी ऍडव्हायझरी अशा नाना प्रकारच्या बाबींचा समावेश असणार आहे.
यासाठी सरकार वेगवेगळ्या सरकारी आपलिकेशनचे एकत्रीकरण करणार आहे. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी याबाबत नुकतीच एक बैठक देखील घेतल्याचे समोर येत आहे. येत्या काही दिवसात ही आपलिकेशन शेतकऱ्यांच्या वापरासाठी लॉन्च केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. या ॲप्लीकेशन मुळे निश्चितच शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे.
संबंधित बातम्या:-
मानलं डॉक्टर साहेब! पेशन्टची सेवा करत केली शेती; डॉक्टरांनी पिकवलेले खरबूज आता फॉरेन रवाना
शेतकरी मोठ्या संकटात!! अचानक द्राक्ष खरेदी बंद, काय झालं असं, जाणुन घ्या याविषयी
Share your comments