देशात सध्या गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. यामुळे शेतकरी समाधानी आहेत. असे असले तरी आता हे दर कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहेत. NCCF केंद्र सरकारच्या वतीने टोमॅटोच्या आयातीसह देशांतर्गत खरेदी करत आहे.
ग्राहकांना चढ्या किमतीपासून दिलासा देण्यासाठी अनुदानित दराने त्यांची किरकोळ विक्री करत आहे. नेपाळमधून आयात केलेले सुमारे ५ टन टोमॅटो गुरुवारी उत्तर प्रदेशमध्ये ५० रुपये प्रति किलो या सवलतीच्या दराने किरकोळ विक्री केले जातील.
NCCF नेपाळमधून एकूण १० टन टोमॅटो आयात करण्याचा करार केला आहे. यामुळे दर कमी होणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना होणारा फायदा आता काही प्रमाणात कमी होणार आहे. यामुळे सरकारवर टीका केली जात आहे.
अखेर शेतकऱ्यांसाठी ती बातमी आलीच! आता शेततळ्यासाठी अर्ज सुरु, जाणून घ्या कुठे आणि कसा करायचा अर्ज...
याबाबत दिल्ली-एनसीआर आणि राजस्थानमध्ये देशातील प्रमुख उत्पादक राज्यांमधून खरेदी केलेले टोमॅटो ५० रुपये प्रति किलो या अनुदानित दराने विकले जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांना देखील दर कमी मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
नेपाळमधून आयात श्रेणीबद्ध पद्धतीने केली जाईल. कारण काही राज्यांच्या मंडईंमध्ये देशांतर्गत आवक सुरू झाली आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या निर्देशानुसार NCCF ने पुढाकार घेतला आहे.
पांढऱ्या कांद्याची शेती उघडणार शेतकऱ्यांचे नशीब, जाणून घ्या शेतीची योग्य पद्धत
NCCF चे व्यवस्थापकीय संचालक अनिस जोसेफ चंद्रा म्हणाले, आम्ही नेपाळमधून १० टन टोमॅटो आयात करण्याचा करार केला आहे. यातील ३-४ टन काल उत्तर प्रदेशात वितरित करण्यात आले. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पांढऱ्या कांद्याची शेती उघडणार शेतकऱ्यांचे नशीब, जाणून घ्या शेतीची योग्य पद्धत
Share your comments