आपण बघत आलोय की शेती करणे म्हणजे आजकाल बेभरवशी काम झाले आहे, यामुळे अनेकदा शेतकरी आर्थिक संकटांचा सामना करतो, असे असताना शेतकऱ्यांना शेतीशिवाय इतर कोणतेही आर्थिक साधन नसते. यामुळे त्यांना उतारवयात अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. यामुळे आता मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतल आहे. आता पीएम किसान मानधन योजना ही सुरु करण्यात आली आहे. सध्या कोट्यावधी शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वयाच्या 60 वर्षानंतर दर महिन्याला 3 हजार रुपये पेन्शन स्वरुपात मिळणार आहेत.
यामध्ये वर्षाला 36 हजार रुपये मिळणार आहेत. सध्या अल्पभूधारक शेतकरी हे आर्थिक संकटांचा सामना करत आहेत. तसेच शेतीचा खर्च देखील वाढला आहे. यामुळे सध्या शेती करणे अवघड झाले आहे. शेतकऱ्यांना भरवश्याचे उत्पन्न असे काही नाही. ही रक्कम अन्नदात्यांना पेन्शन म्हणून दिली जाते. या योजनेचा लाभ देशातील कोट्यवधी अन्नदाते घेऊ शकतात. यामुळे ही योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. यासाठी तुम्हाला आतापासूनच यामध्ये पैसे जमा करावे लागणार आहे.
याकरिता शेतकऱ्यांना प्रीमीयम अदा करावा लागणार आहे. पंतप्रधान किसान मानधन योजनेअंतर्गत पेन्शन मिळण्यासाठी शेतकऱ्याचे वय 18 वर्षे ते 40 वर्षे दरम्यान असावे. तसेच या योजनेसाठी शेतकऱ्यांना दरमहा 55 ते 200 रुपये जमा करावे लागणार आहेत. यानंतरच शेतकऱ्यांना 60 वर्ष पूर्ण झाल्यावर दरमहा 3 हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. मात्र अनेकांनी याचा लाभही घेतला असून अनेक शेतकरी हे पैसे भरत आहेत. यासाठी शेतकऱ्याला प्रथम त्याच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये (सीएससी) जावे लागणार आहे. तसेच काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे.
सर्व कागदपत्रे सादर करून बँक खात्याची माहिती द्यावी लागणार आहे. कॉमन सर्व्हिस सेंटर आधार कार्डला तुमच्या अर्जाशी जोडेल. तुम्हाला किसान कार्ड पेन्शन अकाउंट नंबर दिला जाईल. नंतर कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही या योजनेसाठी स्वत:ची नोंदणी करू शकता. यानंतर तुमचे पैसे कट होतील. शेती उत्पादनाशिवाय शेतकऱ्यांकडे दुसरे कमाईचे साधन नसते यामुळे वृध्दापकाळात शेतकऱ्यांचे जीवन समृद्ध करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारी नौकरदाराप्रमाणे त्यालाही पेन्शन मिळावी या हेतूने ही योजना सुरु करण्यात आली आहे.
Share your comments