मिरची म्हणले की आपल्याला नरम न लागता अगदी तिखट लागते कारण नरम मिरची एवढा तग धरत नाही एवढा तग तिखट मिरची धरते. बाजारामध्ये आपल्याला वेगवेगळ्या मिरच्या पाहायला भेटतात. आज आपण नागालँड प्रदेशातली मिरची पाहणार आहोत जी मिरची अत्यंत तिखट आहे, जे की या मिरचीला "किंग चिली" किंवा "भूत जोलकिया" या नावाने ओळखले जाते. नागालँड ची ही मिरची पहिल्याच वेळी लंडन च्या बाजारामध्ये दाखल झालेली आहे जी की अत्यंत तिखट मिरची म्हणून ओळखली जाते. जे की फक्त एवढंच नाही तर जगातील सर्वात तिखट मिरची पाहून या मिरचीला ओळळले जाते.
नागालँड ची मिरची या खास मुद्यावर वाणिज्य मंत्रालय तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः ट्विट केलेले आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विट मध्ये असे म्हणजे आहे की ही खूपच उत्तम बातमी आहे. त्यांनी असे ही म्हणले आहे की ज्या लोकांनी भूत जोकलिया या मिरचीची चव घेतलेली आहे त्याच लोकांना या मिरचीच्या तिखट पणा बद्धल कल्पना आहे असे मोदींनी आपल्या ट्विट मध्ये म्हणत हा संदेश ट्विट केलेला आहे. तसेच वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी असे म्हणले आहे की ईशान्य भारत मधील मिरची म्हणजेच नागालँड मधील मिरची लंडन शहरामध्ये पोहचलेली आहे.भूत जोकलिया ही तिखट मिरची गुवाहाटी मधून पाठवण्यात आलेली आहे, जे की या मिरचीची पाहिली खेप नुकतीच लंडन शहरामध्ये पोहचलेली आहे. येईल या काही दिवसांमध्ये लंडन मधील नागरिकांना ही मिरची किती प्रमाणात आवडलेली आहे ते पाहावे लागणार आहे.
हेही वाचा :विजय वडेट्टीवार यांनी केली चंद्रपूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी
जगातील सर्वात तिखट मिरची:-
भूत जोकलिया ही मिरची Scoville हीट यूनिट (SHUs) नुसार जगातील जेवढ्या मिरच्या आहेत त्यामधील सर्वात तिखट मिरची असल्याचे सांगण्यात आलेले आहे. वर्ष २००८ मध्ये भूत जोकलिया ही मिरची प्रमाणित केलेली होती. २०२१ च्या जुलै ला म्हणजे या महिन्यांमध्ये या मिरची चे काही नुमने लंडन शहरामध्ये पाठवण्यात आलेले होते. या नंतर तेथील लोकांना मिरची आवडल्याने लंडन मधून मिरचीची ऑर्डर देण्यात आलेली होती.
या मिरचीचे वैशिष्ट्य म्हणजे ही मिरची तिखट तर आहेच पण त्याबरोबर ही मिरची लगेच खराब होत असल्याने याची निर्यात करणे अवघड जात होते. अशा अनेक परिस्तिथी वर मात करत नागालँड मधील कृषी बाजार समितीने भूत जोकलिया या जातीची जगातील सर्वात तिखट मिरची लंडन मध्ये पाठवली.
Share your comments