देशात जेव्हा ठिबक सिंचनची क्रांती झाली तेव्हापासून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा झाला आणि मोठ्या प्रमाणावर शेती लागवडीखाली आली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणवर उत्पन्न वाढले. असे असताना आता यामध्ये काळाच्या बदलात मोठे बदल झाले आहेत, यामुळे यानुसार बदल करणे देखील करणे गरजेचे आहे. यामध्ये मोठे बदल झाल्याचे आपल्याला दिसून येते. सध्या पीक पध्दतीमध्ये बदल होत आहे अगदी त्याप्रमाणेच शेती करण्याची पध्दतही बदलत आहे. नवनवीन यंत्राचा वापर वाढलेला आहे शिवाय पाणी बचतीसाठीही वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. यामुळे यामध्ये शेतकऱ्यांच्याच फायदा आहे. सध्या स्प्रिंक्लर अन्यथा ठिबकचा वापर वाढलेला आहे.
यामध्ये पाण्यातच बचत होते असे नाही तर खताचेही व्यवस्थापन केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना खतांचे देखील व्यवस्थापन समजत आहे. यामुळे खतांची देखील बचत होत आहे. पाण्यात विरघळणारी घनरूप खते आणि द्रवरुप खते पिकांना देण्याच्या क्रियेस फर्टिगेशन असे म्हणतात. ही अत्याधुनिक पध्दत अवलंबण्यास शेतकऱ्यांना उशिर झाला असला तरी आता झपाट्याने यामध्ये वाढ होत आहे. त्यामुळे उत्पादनात देखील वाढ होत आहे. यामुळे अजूनही याकडे न वळालेल्या शेतकऱ्यांनी याकडे जाणे गरजेचे आहे.
ही खते पाण्यात पूर्णपणे विरघळणारी असणे गरजेचे आहे. झाडांना देत असलेल्या खताच्या सिंचनासाठी वापरात असलेल्या पाण्यातील घटकावर रासायनिक प्रक्रिया होऊ नये याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे खतांच्या मात्रेत बचत होते. खताची मात्रा विभागून झाडांच्या गरजेनुसार दिल्यामुळे उत्पन्नात भरीव वाढ देखील होते. तसेच मजुरीच्या खर्चातही बचत होते. यामुळे शेतकऱ्यांचा सगळीकडून फायदा होणार आहे.
आपण बघत आलोय की, पूर्वी पिकांना पाणी हे पाठाद्वारे दिले जात होते. मात्र, यामध्ये अमूलाग्र बदल झाला असून आता स्प्रिंक्लर अन्यथा ठिबकचा वापर वाढलेला आहे. यामुळे केवळ पाण्यातच बचत होतेय असे वाटत होते पण आता ठिबक सिंचनाच्या माध्यमातून खताचेही व्यवस्थापन केले जात आहे. यामुळे हे एक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. यामुळे ठिबक सिंचनातून पाण्याची बचत आणि खताचेही व्यवस्थापन करणे सोपे आणि गरजेचे झाले आहे.
Share your comments