1. बातम्या

नवीन वर्षात मोबाईल रिचार्जे करणे झाले अजून महाग, जाणुन घ्या नेमकं काय आहे कारण

भारतात गेल्या काही आठवड्यापूर्वी मोबाईल प्रिपेड रिचार्ज (Mobile prepaid recharge) चांगलेच वाढले होते. भारतातील सर्वच टेलिकॉम कंपन्यांनी (By telecom companies) आपले मोबाईल रिचार्ज दर वीस ते पंचवीस टक्के वाढवले होते. यामुळे सामान्य नागरिकांना अधिक पैसा द्यावा लागत आहे. आधीच जिओ, वोडाफोन आयडिया, बीएसएनएल, एअरटेल या कंपन्यांनी वीस ते पंचवीस टक्के आपले प्रीपेड प्लॅन वाढवलेले आहेत. आणि आता अशी बातमी समोर येत आहे की या सर्व कंपन्या प्रीपेड प्लॅन्समध्ये अजून वाढ करणार आहेत. त्यामुळे 2022 मध्ये आता इंटरनेट कनेक्टिव्हिटी (Internet connectivity) तसेच कॉलिंग सेवा (Calling service) महागणार आहेत.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
Image Courtesy-Microwavejournal.com

द इकॉनॉमिक टाइम्स नुसार, मोबाईल वापरकर्त्यांची अडचण 2022 मध्ये अजूनच वधारणार आहे, कारण की भारतातील सर्वच कंपन्या 2022 मध्ये आपले प्रीपेड प्लॅन्सची रक्कमेत वाढ करण्याच्या विचारात आहेत. असे सांगितले जात आहे की या दरवाढीचे प्रमुख कारण 5G असणार आहे, देशात 5G सर्विसेस (5G services) सुरू होताच, देशातील अग्रगण्य टेलिकॉम कंपन्या म्हणजे VI, BSNL, Bharti Airtel, Reliance Jio आपल्या प्रिपेड मोबाईल प्लॅनचा टैरिफ अजून एकदा वाढवणार आहेत.

काय आहे नेमके कारण मोबाईल रिचार्ज प्लान्स वाढण्याचे (What is the reason for the rise of mobile recharge plans)

या दरवाढीचे प्रमुख कारण म्हणजे 5G सर्विसेस आहेत, आम्ही आपणास सांगू इच्छितो की, देशात लवकरच फाईव्ह जी सर्विसेस सुरू होणार आहेत आणि यातून टेलिकॉम कंपन्यांना डिजिटल सेवा विभाग आणि एंटरप्राइझ कडून अतिरिक्त महसूल कमवता येईल आणि कंपन्याचा फायदा होईल, मात्र असे असले तरी दुरून डोंगर साजरे सारखी गोष्ट आहे कारण की कंपन्यांना यासाठी मोठी रक्कम देखील मोजावी लागणार आहे. सर्व टेलिकॉम कंपन्याना एअरवेव्हचा लिलाव (Airwave auction) खरेदी करावा लागेल आणि त्यासाठी कंपन्यांना मोठी रक्कम मोजावी लागणार आहे.

एकंदरीत 5G सर्विसेस मुळे मोबाईल वापरकर्त्यांना (To mobile users) सुविधा उपलब्ध होणार आहे, तसेच यामुळे त्यांच्या खिशाला मोठी कात्री देखील लागणार आहे. ते म्हणतात ना कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है 5G सर्विसेस त्याचेच एक उत्तम उदाहरण सिद्ध होणार आहे.

English Summary: mobile prepaid price will hike in 2022 what is the reason behind that Published on: 02 January 2022, 01:34 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters