कृषीची माहिती, सद्यस्थितीची माहिती देणारे मोबाईल ऐप

03 July 2020 12:47 PM


आजच्या या डिजिटल क्रांतीच्या युगात शेतीक्षेत्र कसे मागे राहील शेतीमध्ये आज डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. माहिती व तंत्रज्ञानाने शेती क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणली आहे, जमीन तयार करण्यापासून ते पीक काढणी, मार्केटिंग, प्रोसेसिंग सर्व क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले आहे. कृषी तज्ञांनी माहिती व तंत्रज्ञानाचा आधारे शेती खर्च कमी करण्यास व जास्तीत जास्त उत्पादन कसे वाढवता येईल व जास्तीत जास्त नफा कसा होईल याबद्दल संशोधन केले आहे.

आज या कोरोनाच्या संकटात शेतकऱ्यांसोबत संवाद साधण्यासाठी, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी फेसबुक, युट्युब, झूम ॲप यांसारखी समाजमाध्यमे मोलाची कामगिरी बजावत आहेत. मागील काही वर्षात झालेली स्मार्टफोनच्या क्रांतीने कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविला आहे. स्मार्टफोन शेतकऱ्यांपर्यंत पोचले. यामुळे कृषी विषयक माहितीचे वहन शेतकऱ्यांपर्यंत सहज होऊ लागले. या माहितीच्या वाहनांमध्ये मोलाची भूमिका असणारे कृषीविषयक मोबाईल ॲप आपण माहीत करून घेणार आहोत

ॲग्रोटेक VNMKV
२९ मे २०१७ मध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांनी लॉंच केले आहे. हे ॲप शेतकऱ्यांसाठी विद्यापीठाने शिफारस केलेल्या तंत्रज्ञानाविषयी माहितीचा पुरवठा करते. या ॲपमध्ये खरीप पिके, रब्बी पिके, फळझाडे, भाजीपाला लागवडीची शास्त्रशुद्ध पद्धतीने माहिती देण्यात आली आहे.
कापूस VNMKV
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ द्वारा तयार करण्यात आलेल्या या ॲपमध्ये कपाशीची सद्यस्थिती, लागवडीची पूर्वतयारी, बीटी वाणांची निवड, कापूस लागवड, बीज प्रक्रिया, अन्नद्रव्य व्यवस्थापन, तणनियंत्रण, पाणी व्यवस्थापन, कापूस वाढ व्यवस्थापन, कीड व्यवस्थापन, रोग व्यवस्थापन, वेचणी व साठवण, कपाशीवरील लाल्याचे व्यवस्थापन, सघन कापूस लागवड यासर्व बाबींबद्दल शास्त्रीय पद्धतीने माहिती दिलेली आहे.
एकात्मिक तण व्यवस्थापन
या ऐपमध्ये एकात्मिक तण व्यवस्थापन बद्दल माहिती देण्यात आली आहे. यामध्ये तणांमुळे होणारे नुकसान, पीक-तण स्पर्धा, नियंत्रणाचे उपाय, तणनाशके व त्यांचे प्रकार, तणनाशकाची मात्रा काढणी व विक्री यायचं नाशकांचा वापर याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे.
किसान सुविधा
२९ मार्च २०१६ रोजी पंतप्रधानांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. हे ॲप शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन बनवण्यात आले आहे. हे ॲप हिंदी, इंग्रजी ,पंजाबी, तमिळ आणि गुजराती या भाषेत उपलब्ध आहे. या ॲपमध्ये हवामान, बाजारभाव, वनस्पती संरक्षण, कृषी सल्लागार, केसीसी, विक्रेते, इत्यादी संबंधी माहिती देण्यात आली आहे.
कृषी दर्शनी
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी दरवर्षी प्रकाशित होणारी कृषिदर्शनी डिजिटल पद्धतीने या ॲपमध्ये सादर केली आहे. यामध्ये विद्यापीठाच्‍या संशोधन शिफारसी, कृषी हवामान पिके, विविध शेती पद्धती, पशुसंवर्धन, जलसंवर्धन, ठिबक सिंचन, भूजल मृदा व जलसंधारण, तणनियंत्रण, कीड व्यवस्थापन, कृषी अवजारे, रेशीम उत्पादन, गांडूळ शेती, आळंबी उत्पादन, विद्युत मोटार आणि सौर ऊर्जा, कृषी तंत्रज्ञान व माहिती केंद्र, कृषी अर्थशास्त्र याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
शेतकरी मासिक ॲप
कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या द्वारा प्रकाशित होणारे शेतकरी मासिक डिजिटल पद्धतीने या ॲपमध्ये सादर केले आहे या ॲपमध्ये कृषी विद्यापीठ, कृषी विभाग या मधील तज्ञ लोकांनी लिहिलेले लेख उपलब्ध आहेत.
कृषी जागरण
कृषी जागरण हे मोबाईल ॲप सुद्धा शेतकऱ्यांसाठी फार उपयुक्त आहे. यामध्ये तज्ज्ञांनी लिहिलेले कृषी विषयक लेख तर मिळतीलच त्याचबरोबर आपण आपला व्यवसाय या ॲपमध्ये नोंदणी करून वाढू शकतो. कीटकनाशकांच्या कंपन्या, कृषी विद्यापीठे आणि कृषी महाविद्यालय, सौर ऊर्जा कंपन्या, नर्सरी ,डेअरी कंपनी, शेतकरी कंपन्या आणि कंपनी विमा कंपनी कंपन्या, कृषी विज्ञान केंद्र, पोल्ट्री याबद्दल आपणास माहिती या ॲपमध्ये मिळेल.
हळद लागवड तंत्रज्ञान
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठद्वारा हळद प्रदर्शित ॲप हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे. यामध्ये हळदीचे उपयोग, प्रकार, पिकाच्या अवस्था हवामान व जमीन याबरोबरच हळद लागवडीची पूर्व मशागत यासंबंधी सर्व माहिती दिलेली आहे.

IPM VNMKV


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ द्वारा विकसित ॲप शेतकऱ्यांना नगदी पिके, कडधान्य / डाळवर्गीय पिके, गळीत पिके, तृणधान्ये पिके ,यावरील किडीचे एकात्मिक पद्धतीने कसे व्यवस्थापन करावे याबद्दल मार्गदर्शन केले आहे

मेघदूत


भारतीय हवामान विभाग भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेने विकसित केलेली मेघदूत हे शेतकऱ्यांसाठी फार उपयुक्त आहे. या ॲपमध्ये हवामानावर आधारित शेती व्यवस्थापन करण्यासाठी फार उपयुक्त माहिती उपलब्ध आहे . हे ॲप दहा भाषांमध्ये उपलब्ध आहे, या ॲपच्या माध्यमातून तापमान, पाऊस, वाऱ्याचा वेग व दिशा यासंबंधी माहिती शेतकऱ्यांना मिळेल व त्यानुसार आपण आपले नियोजन करू शकतो

सर्व ॲप प्ले स्टोअरवर उपलब्ध असून शेतकरी बंधूंना मी अशी विनंती करतो की आपण हे ॲप आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून त्यामधील माहितीच्या आधारे आपल्या शेती तंत्रात सुधारणा करावी व जास्तीत जास्त उत्पादन घ्यावे.

 

लेखक -

महेश देवानंद गडाख

MSc(Agri)

चैतन रतन गडाख

MSc(Agri)

भागवत ज्ञानेश्वर देवकर

Bsc (Agri)

agriculture mobile application mobile application helps to farmers digital farming farmer digital farmer मोबाईल ऐप शेतकऱ्यासाठी मोबाईल ऐप डिजिटल शेती VNMKV ॲग्रोटेक VNMKV कापूस VNMKV किसान सुविधा
English Summary: mobile application helps to farmers, sharing agriculture information and news

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.