सध्या शिंदे-फडणवीस सरकारचे पहिलेच पावसाळी अधिवेशन पार पडत आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले असून आता विरोधक त्यांना घेरण्याची तयारी करत आहेत. असे असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलनावेळी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आतापर्यंत घोषणा देऊन निषेध केला जात होता.आता मात्र ही घटना समोर आल्यानंतर आता मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि सेनेचे महेश शिंदे यांच्यामध्ये ही धक्काबुक्की झाली आहे. यामुळे लोकप्रतिनिधींकडून अशा प्रकारची लाजीरवाणी कती घडणं राज्याची मान शरमेने खाली घालणारी आहे.
हे सर्व आमदारांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. यामुळे आता आमदारांवर कारवाई होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. असे असताना राष्ट्रवादीचा एक आमदार या सगळ्यांना आवरताना दिसला. ते आमदार म्हणजे रोहित पवार. रोहित पवार यांनी आक्रमक झालेल्या आमदारांना शांत करण्याचा प्रयत्न केला. सत्ताधाऱ्यांनी उद्धव ठाकरेंविरोधात आंदोलन केले. त्याचवेळी विरोधकदेखील पायऱ्यांवर घोषणा देत आंदोलन करत होते.
Sugarcane FRP; एफआरपीचे तुकडे होऊ देणार नाही, ऊस उत्पादकांसाठी किसान सभेचा मोठा निर्णय
यावेळी शिंदे गटातील महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यात शाब्दीक वाद झाला. यानंतर प्रकरण थेट धक्काबुक्कीपर्यंत गेले. असे असताना अजित पवार यांनी मार्ग काढत वाद थांबवला. या वादात अमोल मिटकरी यांनी महेश शिंदे यांची कॉलर पकडली असल्याचे दिसून आले. यामुळे मोठा राडा झाल्याचे दिसून आले. यावेळी मोठी घोषणाबाजी करण्यात आली.
'शहाजीबापू पाटील यांनी आमदारकी निवडणूक लढवण्यासाठी 20 लाख रुपये घेतले होते, मात्र परत केले नाहीत'
याबाबत अमोल मिटकरी म्हणाले की, शिंदे गटातील नेत्यांनी सर्वात प्रथम शिवीगाळ केली. आई-बहिणींनीवरुन शिवीगाळ केल्याचे मिटकरी यांनी सांगितले. यामुळे प्रकरण खूपच तापले असल्याचे दिसून आले. यामुळे आज सत्ताधारी देखील घोषणा देताना दिसून आले.
महत्वाच्या बातम्या;
'CM Eknath Shinde: शेतकरी भावांनो, तुमचा जीव झाडाला टांगण्याइतका स्वस्त नाही, मी कासावीस होतो'
शेतकरी घरबसल्या कमवणार पैसे! शेतकरी 'पत्रकार' चे पहिले सत्र संपन्न, कृषी जागरणकडून आयोजन...
शिवार ते ग्राहक शेतीमाल विक्रीसाठी राजू शेट्टी आग्रही, मोदी सरकारकडे केली मोठी मागणी
Share your comments