येत्या 24 ऑक्टोबरपासून आमदार रोहित पवार युवा संघर्ष यात्रा काढणार आहे. युवावर्गाला भेडसावणाऱ्या आव्हानांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ही यात्रा काढण्यात येणार आहे. आमदार रोहित पवार राज्यातील असंख्य युवांसोबत पुणे ते नागपूर अशी पदयात्रा करणार आहेत. तब्बल 13 जिल्ह्यातून 800 किलोमीटरची ही पदयात्रा असेल. या यात्रेला पुण्यातील महात्मा फुले वाडा येथून सुरवात होणार आहे.
नुकतचं या यात्रे संदर्भातील एक पोस्टर रोहित पवार यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंट शेअर केलं आहे. या जग अत्यंत वेगाने बदल आहे. रोज नवनवीन तंत्रज्ञानाची निर्मिती होत असून बदलत्या काळानुसार रोजगाराचे स्वरूप देखील बदलत आहे, म्हणूनच रोजगार मिळवण्यासाठी देशातील युवांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे. युनिसेफच्या (UNICEF) एका अहवालानुसार भारतातील 50% तरूणांकडे 2030 सालानंतर निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधींसाठी आवश्यक असणारी कौशल्ये नाहीत. संघटित क्षेत्राच्या तुलनेत असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांच्या रोजगारावर या बदलांचा अधिक परिमाण होणार आहे.
आज देशातील 90% हून अधिक कामगार असंघटित क्षेत्रात काम करतात आणि हे कामगार मुख्यत्वे शारीरिक श्रमाची कामे करत असल्यामुळे येत्या काळात संगणक आणि कृत्रिम बुद्धिमतेचा वापर करून ही कामे केली जातील. त्यामुळे येत्या काळात राज्यातील
असंघटित क्षेत्रातील युवांचे Reskilling, Upskilling करून त्यांना कालानरूप बदलणा-या रोजगारांसाठी पात्र बनवने गरजेचे आहे आणि या मागणीसाठीच आम्ही युवा संघर्ष यात्रा काढत आहोत. असे पोस्टर रोहित पवार यांनी ट्विटरवर शेअर केलं आहे.
तसेच पुण्यातील तुळापूर येथून या यात्रेला सुरुवात होऊन नागपूर येथे 7 डिसेंबर रोजी या यात्रेचा समारोप होणार आहे. काष्टी, कर्जत, पाटोदा, बीड, जातेगाव, पिंपळगाव, कुंभार, परतुर, जिंतूर, सेनगाव, वनोजा, वाशिम, कारंजा, पापळ, पुलगाव, सेवाग्राम, बाजार गाव, नागपूर असा या यात्रेचा मार्ग असणार आहे.
Share your comments