अचलपूर विधानसभा मतदार संघातील निराधार, विधवा, परितक्त्या आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांच्या पाठीशी राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू खंबीरपणे उभे ठाकले आहेत. त्यांना अचलपूर विधानसभा मतदार संघामध्ये ट्रॅक्टरचा डिझेल तुमचे ही अभिनव योजना राबवत आहे.
कुटुंबातील कर्ता व्यक्ती यांच्या निधनानंतर किंवा पतीच्या निधनानंतर कुटुंबाचा चरितार्थ चालविण्याची वेळ त्या महिलांवर येते. या महिलांना हे करत असतांना याच प्रकारच्या समस्या येतात. जसे की, नांगरणी, वखरणी, पावसाळा सुरू झाला तर बी बियाण्यासाठी पैसा आणायचा कुठून अशा विवंचनेत या महिला भगिनी असतात.
नेमकी हीच समस्या हेरून राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमची योजना अमलात आणली. या योजनेचा अचलपूर तालुक्यातील महिलांना लाभ होत आहे. राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या मातोश्रीश्रीमती इंदिरा आई कडू यांच्या वाढदिवसा प्रसंगी या योजनेचा प्रारंभ करण्यात आला.
या योजनेची सुरुवात अचलपूर विधानसभा मतदारसंघात सुरू झाली आहे. आतापर्यंत जर विचार केला तर जवळ जवळ शंभर एकर पेक्षा जास्त शेतीची कामे या योजनेतून करून घेण्यात आले आहे. या योजनेच्या माध्यमातूनराज्यमंत्री बच्चुभाऊ कडू कुटुंबीय प्रमाणे एका आधार वडाची भूमिका निभावत आहेत.
Share your comments