1. बातम्या

अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाकडून ऑपरेशन ग्रीन्ससाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी

नवी दिल्ली: केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांच्या अंतर्गत अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने आज ऑपरेशन ग्रीन्ससाठी कार्यान्वयन धोरण मंजूर केले आहे. 2018-19 च्या अर्थसंकल्पात टोमॅटो, कांदा आणि बटाटा (टॉप) पिकांच्या सुरळीत पुरवठ्यासाठी तसेच वर्षभर स्थिर किमतीनुसार देशात संपूर्ण पिकांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी 500 कोटी रुपये खर्च करून ऑपरेशन ग्रीन्सची घोषणा करण्यात आली होती.

KJ Staff
KJ Staff


नवी दिल्ली:
केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांच्या अंतर्गत अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने आज ऑपरेशन ग्रीन्ससाठी कार्यान्वयन धोरण मंजूर केले आहे. 2018-19 च्या अर्थसंकल्पात टोमॅटो, कांदा आणि बटाटा (टॉप) पिकांच्या सुरळीत पुरवठ्यासाठी तसेच वर्षभर स्थिर किमतीनुसार देशात संपूर्ण पिकांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी 500 कोटी रुपये खर्च करून ऑपरेशन ग्रीन्सची घोषणा करण्यात आली होती.

"टॉप पिकांची अस्थिर किंमत नागरिकांसाठी संकट आहे. ही एक क्रांतिकारक योजना आहे जी सर्व हितधारकांशी निरंतर संवादानंतर विकसित झाली आहे तसेच टॉप पिकांच्या किमती स्थिर करण्यासाठी आणि वर्षभर देशांतील सर्व कुटुंबांना पिकांची उपलब्धता निश्चित करून देण्यासाठी आम्ही धोरण निश्चित केले आहे, असे बादल यावेळी म्हणाल्या. टॉप पिकांचे उत्पादन आणि मूल्यवर्धित शृंखला वाढवण्यासाठी या योजनेअंतर्गत विशेष उपाययोजना आणि अनुदान सहायता देण्यात आली आहे असेही बादल यांनी नमूद केले.

मंत्रालयाने ठरवलेल्या उपाययोजनांच्या मालिकेमध्ये या धोरणाचा समावेश असेल:

1. अल्प मुदत किंमत स्थिरीकरण उपाय: किंमत स्थिरीकरण उपायांची अंमलबजावणी करण्यासाठी नाफेड नोडल एजन्सी असेल. 
    खालील घटकांवर मंत्रालय पन्नास टक्के सबसिडी देईल

  • टोमॅटो कांदा बटाटा (टॉप) पीक उत्पादनाची उत्पादन ते साठवणूक जागेपर्यंत वाहतूक
  • टॉप पिकांसाठी योग्य साठवणूक व्यवस्था करणे

2. दीर्घकालीन एकात्मिक मूल्य श्रृंखला विकास प्रकल्प:

  • एफपीओ आणि त्यांच्या संघटनेची क्षमता निर्मिती
  • गुणवत्ता उत्पादन
  • कापणीनंतरची सोयी सुविधा
  • कृषी-खर्च
  • विपणन / खर्चाचे मुद्दे
  • टॉप पिकांच्या मागणी आणि पुरवठा व्यवस्थापनासाठी ई-प्लॅटफॉर्मची निर्मिती आणि व्यवस्थापन.


निवडलेली क्लस्टर्स:

अ.क्र

राज्य

उत्पादन क्षेत्र

टोमॅटो

1

आंध्रप्रदेश

चित्तूर आणि अनंतपुर (खरीप आणि रब्बी) 

2

कर्नाटक

कोलार आणि चिक्काबल्लापूर (खरीप)

3

ओडिशा

मयूरभंज आणि केओंजर (रब्बी)

4

गुजरात

सबरकंथा

कांदा

1

महाराष्ट्र 

नाशिक (रब्बी)

2

कर्नाटक 

गडग आणि धारवाड (खरीप)

3

गुजरात

भावनगर आणि अमरेली

4

बिहार

नालंदा

बटाटा

1

उत्तर प्रदेश 

अ) आग्रा, फिरोजाबाद, हाथरस आणि अलीगड
ब) फारुकाबाद आणि कन्नुज 

2

पश्चिम बंगाल 

हुगली आणि पुरबा बर्धमान

3

बिहार

नालंदा

4

गुजरात

बंसकंथा आणि सबरकंथा


* टॉप पिके म्हणजे: टोमॅटो, कांदा, बटाटा

English Summary: Ministry of Food Processing Industries issues guidelines for Operation Greens Published on: 06 November 2018, 01:06 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters