गेल्या काही दिवसांपासून राज्यात महावितरणकडून सक्तीची वीजवसुली केली जात आहे. असे असताना आता शेतकरी आक्रमक झाले आहेत. अनेक ठिकाणी शेतकरी रोज आंदोलने करत आहेत. शेतकऱ्यांची पिके यामुळे जळू लागली आहेत. यामुळे त्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहेत. यामुळे आता तरी विजतोडणी थांबणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. असे असताना आता कृषीपंपाकडील वसुली अदा करुनही विद्युत पुरवठा सुरळीत होत नसल्याने संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा ताफा पुणे-सोलापूर मार्गावरील टेंभुर्णी येथे अडविला होता.
यामुळे काहीवेळ वातावरण तापले होते, यावेळी सक्तीच्या वसुलीतून शेतकऱ्यांची मुक्तता करण्याची मागणी केली. यावर भरणे यांनी तोडगा सांगितला. शेतकऱ्यांची परिस्थिती ही नाजूक आहे. शिवाय वाढती थकबाकी हा केवळ सोलापूर जिल्ह्याचाच विषय नसून राज्याचा झाला आहे. त्यामुळे सक्तीची वसुली न करता बिलाचे टप्पे पाडण्याची मागणी कॅबिनेटच्या बैठकीत करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यामुळे आता यामध्ये काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पैसे देखील भरले आहेत. शेतकऱ्यांनी प्रति कृषीपंपाला घेऊन 5 हजार रुपये अदा केले आहेत. असे असताना पुन्हा महावितरणकडून सक्तीची वसुली केली जात आहे.तसेच सुरळीत विद्युत पुरवठा नसल्याने पिकांचे नुकसान देखील होत आहे. पोषक वातावरणामुळे पिके जोमात आहेत पण आता ऐनवेळी पाणी मिळत नसल्याने उत्पादनावर परिणाम होणार आहे. यामुळे याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत.
कृषीपंपाच्या बिलापोटी रक्कम भरूनही पुन्हा वसुलीसाठी अधिकारी खेटे मारत आहेत. त्यामुळे पिकांची जोपासणा करावी कशी असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. वाढीव वीजबिल आणि सक्तीची वसुली ही शेतकऱ्यांवर अन्यायकारक आहे. त्यामुळे कृषीपंपाचा बिलभरणा हा टप्प्याटप्प्याने करण्याची गरज आहे. यामुळे याचा शेतकऱ्यांवर देखील मोठा ताण येणार नाही. यामुळे यावर लवकरात लवकर निर्णय होणे गरजेचे आहे. आता उन्हाळा देखील जाणवू लागला आहे. यामुळे पिकांना पाण्याची गरज आहे.
दरम्यान, तसेच शेतकऱ्यांनी यापूर्वीच ठरवून दिलेली रक्कम अदा केली आहे त्यांना पुन्हा सक्तीची वसुली करू नये. महावितरणने शेतकऱ्यांचा आणि शेतकऱ्यांनी महावितरणचा विचार केला तर हा प्रश्न मार्गी लागणार आहे. शिवाय कॅबिनेटच्या बैठकीत वीजबिलावर तोडगा काढला जाणार असल्याचे आश्वासनही त्यांनी भरणे यांनी यावेळी दिले. यामुळे आता काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Share your comments