केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा अधिश बंगला जुहू येथे आहे. या बंगल्यात काही दिवसांपूर्वी अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार झाली होती. त्यानंतर मुंबई महापालिकेने राणे यांना या बांधकामाबद्दल नोटीस बजावली होती.
यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. पालिकेने राणे यांच्या बंगल्याची पाहणीही केली होती. त्यानंतर महापालिकेने अहवाल तयार केला होता. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यातच ठाकरे राणे हा वाद देखील चिघळला होता.
आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अखेर राणेंच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकाम तोडण्याचं काम सुरू झालं आहे. स्वत: नारायण राणे यांनीच हे बांधकाम तोडण्यास सुरुवात केली आहे.
शेतकऱ्यांना दिवसाच वीज द्या! आता युवासैनिक उतरले मैदानात..
दरम्यान, राणे यांनी कोर्टात धाव घेतली होती. कोर्टानेही पालिकेचा रिपोर्ट ग्राह्य धरून राणे यांच्या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याचे मान्य केले होतं. यामुळे बंगला कधी पाडला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कोर्टाने दोन आठवड्यात बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते.
तसेच कोर्टाने राणेंना दहा लाखाचा दंडही ठोठावला होता. यामुळे ही कारवाई होणार असल्याचे सांगितले जात होते. कोर्टाच्या या आदेशानंतर आजपासून राणे यांनी त्यांच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकाम तोडण्यास सुरुवात केली आहे.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार तरी कधी? 110 दिवसात 1100 शेतकऱ्यांची आत्महत्या..
असे असले तरी राणे यांनी हे बांधकाम पाडल्यानंतर महापालिका पुन्हा पाहणी करणार आहे. यामुळे राणे यांनी याबाबत मवाळ भूमिका घेतली आहे. यावरून काही दिवसांपासून बराच वाद सुरू झाला होता.
महत्वाच्या बातम्या;
आता बिअर कडू लागणार नाही, येणार स्वादिष्ट बिअर...
राजू शेट्टींनी इशारा देताच छत्रपती कारखान्याचे गाळप बंद, FRP पेक्षा 200 जास्तच घेणार...
शेतकऱ्यांनो गाय, म्हैस आणि शेळी खरेदी विक्रीसाठी अॅप, सर्व कामे होतील एका क्लिकवर
Share your comments