मालेगाव : महाराष्ट्राचे कृषी मंत्री (Agricultural Minister) तसेच मालेगाव बाह्य चे लोकप्रिय आमदार नेहमीच आपल्या कार्यामुळे चर्चेत राहिले आहेत. दादा भुसे आपल्या युनिक स्टाइलमुळे त्यांच्या मतदारसंघात मोठा चर्चेचा विषय ठरत असतात. फक्त मालेगाव बाह्य (Malegaon Rural) मध्येच नाहीतर संपूर्ण राज्यात दादा भुसे (Dada Bhuse) आपल्या युनिक स्टाईलमुळे चर्चिलं जाणारे व्यक्तिमत्व आहे.
भुसे शेतकऱ्यांच्या (Farmer) प्रश्नांबाबत नेहमीच आक्रमक असल्याचे बघायला मिळाले आहे. त्यांनी जेव्हा वेषांतर करून शिवकाळातील बहिर्जी नाईक प्रमाणे बाजार समितीत स्टिंग केले होते तेव्हा संपूर्ण राज्यात दादांचीचं चर्चा होती आता पुन्हा कृषिमंत्री चर्चेत आले आहेत. दादाजी भुसे यांनी आपल्या मतदारसंघात असलेल्या एका जुगार अड्ड्यावर धाड टाकत जुगार अड्डा उद्ध्वस्त केला आहे. हा प्रकार मालेगाव तालुक्यातील झोडगे या ठिकाणी घडला आहे.
Important News : Organic Fertilizer : शेणखताची डिमांड वाढली!! एक ट्रकची किंमत ऐकून बसेल शॉक
याबाबत अधिक माहिती अशी की, आपल्या मतदारसंघातील झोडगे या ठिकाणी एका कार्यक्रमासाठी गेले असता भुसे यांना त्या ठिकाणी अवैध जुगार अड्डा असल्याचे बघायला मिळाले. यामुळे युवा पिढी जुगाराच्या आधीन जातं असल्याची धक्कादायक परिस्थिती ग्रामस्थांनी भुसे यांच्या कानावर घातल्या नंतर क्षणाचाही विलंब न करता पोलिस प्रशासनाच्या मदतीने कृषी मंत्री दादा भुसे यांनी जुगार अड्डा उध्वस्त केला.
हेही वाचा : शेट्टींचे पवारांना रोखठोक बोल!! ऊस शेती आळशी शेतकऱ्यांची मग आपल्या नातवाचे इतके साखर कारखाने का?
हा काही पहिलाच प्रकार आहे असे नाही नुकत्याच काही महिन्यांपूर्वी भुसे यांनी त्यांच्या मतदारसंघांमध्ये अशाच प्रकारची एक कारवाई केली होती. भुसे दस्तुरखुद्द असल्यामुळे ताबडतोब त्यावेळी देखील त्यांनी कारवाई केली होती. या प्रकरणावरून भुसे यांचा दस्तुरखुद्दपणा बघायला मिळत असला तरीदेखील पोलिस प्रशासनाच्या कामगिरीवर मोठे प्रश्नचिन्ह उभे होत आहे.
Share your comments