Chhatrapati Sambhajinagar : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण द्या, या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आंदोलन केले. त्याच्या आंदोलनाला काही प्रमाणात यश आलं असून कुणबी नोंद सापडल्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटपाचे कामकाज सुरु करण्यात आले आहे. मात्र मनोज जरांगेंनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे आणि आरक्षण द्यावे, अशी मागणी केली आहे. यावर मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी विरोध होताना दिसत आहे. त्यामुळे १७ तारखेला मंत्री भुजबळ यांनी अंबड येथे ओबीसींच्या महामोर्चाचे आयोजन केले आहे. त्या मोर्चाला आमंत्रणाची वाट न पाहता सर्वांनी मोठ्या संख्येने यावे, असं आवाहन त्यांनी केले आहे.
मंत्री भुजबळ आज (दि.६) रोजी मराठवाडा दौऱ्यावर आहेत. छत्रपती संभाजीनगर येथून बीडकडे जात असताना मंडल स्तंभाला अभिवादन करताना अंतरवाली सराटी फाट्यावर भुजबळ यांनी भाषण केले. यावेळी भुजबळांनी त्यांची भूमिका मांडली आहे. तर, भुजबळांनी जामखेड फाटा येथे स्वागत स्वीकारताना बांधवांना मोर्चे आणि आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे.
मंत्री छगन भुजबळांची ऑडिओ क्लिप व्हायरल
सोशल मिडीयावर मंत्री छगन भुजबळ यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. ती क्लिप भुजबळ आणि एका कार्यकर्त्यामधील आहे, असं दिसून येत आहे. यात छगन भुजबळ कार्यकर्त्याला सांगत आहेत की, 'आवाज उठवा. एकटा कुठपर्यंत वेळ काढणार. आता तालुका-तालुक्यातून, गावागावातून ज्या पद्धतीने बुलडोझर चालवले जात आहेत, त्यामधून ओबीसी काय वाचणार नाही आता. त्यामुळे आता करेंगे या मरेंगे हेच केलं पाहिजे. मी याविरोधात आता उभा राहतोय, असे छगन भुजबळ कार्यकर्त्याला सांगताना ऐकायला मिळत आहे.'
भुजबळांच्या ऑडिओ क्लिपवर जरांगेंचे प्रत्युत्तर
"करेंगे या मरेंगे असे म्हणणे त्यांचा प्रश्न आहे. पण आमचं म्हणणे आहे की, 'लड़ेंगे भी और जीतेंगे भी' असे जरांगे म्हणाले. तर, आम्हाला अजून आरक्षण मिळालेच नाही, अजून लढा सुरु आहे.
Share your comments