1. बातम्या

काँग्रेसच्या गोटातून मोठी बातमी! मंत्री बाळासाहेब थोरात यांचा विधिमंडळ गटनेतेपदाचा राजीनामा

विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे पाच उमेदवार विजयी झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारला जोरदार हादरे बसू लागले आहेत.एकंदरीत महाविकास आघाडी सरकारचा अडचणीत आले आहे. एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळणार की काय?

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
minister balasaheb thorat give resign to vidhimandal gatnete post

minister balasaheb thorat give resign to vidhimandal gatnete post

 विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे पाच उमेदवार विजयी झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारला जोरदार हादरे बसू लागले आहेत.एकंदरीत महाविकास आघाडी सरकारचा अडचणीत आले आहे. एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळणार की काय?

अशी स्थिती निर्माण झाली आहे. परंतु या सगळ्या धावपळीत  काँग्रेस मध्ये देखीलअंतर्गत धुसफूस पाहायला मिळत असूनमंत्री  बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ गटनेते पदाचा राजीनामा दिला आहे.

काल झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचे हंडोरे पराभूत झाले. यावर प्रतिक्रिया देताना बाळासाहेब थोरात यांनी म्हटले होते की, यापराभवाची जबाबदारी मी घेतो.पहिल्या पसंतीचे काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला आहे.

नक्की वाचा:मी पुन्हा येईन' चा प्रयोग होणार यशस्वी? एकनाथ शिंदे भाजपच्या राज्यात दाखल..

काँग्रेसचे एकूण 44 मते असताना 41 मते मिळाली आहेत म्हणजे काँग्रेसचे तीन मते फुटली आहेत. सोमवारी निवडणुकीचा कल हाती येथील बाळासाहेब थोरात यांनी पराभव स्वीकारत

''आमच्या पक्षाची मते फुटली हे इतरांना काय दोष द्यायचा''असे म्हटले होते.आता त्यांनी त्यानंतर विधिमंडळ गटनेते पदाचा राजीनामा दिला आहे.

 बाळासाहेब थोरात यांनी काय दिली होती प्रतिक्रिया?

 सोमवारी विधान परिषदेचे निकाल जाहीर झाले त्यानंतर प्रसिद्धिमाध्यमांशी बाळासाहेब थोरात बोलत असताना त्यांनी म्हटले की, आमच्याच पक्षाचे मतदार फुटत असतील तर दुसऱ्यांना दोष देऊन काय फायदा? इतरांना दोष देण्याचा मुद्दाच नाही.

आता आम्हाला विचार करण्याची गरज असून अडीच वर्षे सत्तेत राहून देखील जर आमदारांमध्ये नाराजी असेल तर नेमकी कुठे काय चुकते याचा विचार करण्याचीदेखील गरज असल्याचे त्यांनी म्हटले होते.

नक्की वाचा:मोठी बातमी! राज्यात खळबळ; बाळासाहेब थोरात राजीमाना देणार? सूत्रांची माहिती

 काँग्रेसचे नेते दिल्लीला जाणार

राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसचे काही महत्त्वाचे बडे नेते आणि आमदार आज दिल्लीला जाणार आहेत.विधान परिषदे मधील पराभवानंतर काँग्रेस नेते पक्ष नेतृत्वाची भेट घेणार आहेत.

नक्की वाचा:मोठी बातमी! शिवसेनेत फूट, महाविकास आघाडी सरकार पडण्याचा धोका वाढला सरकार वाचवण्यासाठी हालचालींना वेग

English Summary: minister balasaheb thorat give resign to vidhimandal gatnete post Published on: 21 June 2022, 02:24 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters