मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये व्यापाऱ्यांना गंडा घालण्याची मालिका सुरूच आहे. आता आणखी एका आयात-निर्यात कंपनीला याचा फटका बसला आहे. त्यामुळे बाजार समितीच्या सर्वच व्यापारी आणि संबंधित घटकांनी सावध होण्याची वेळ आली आहे. या कंपनीत जुनेद शेख नामक व्यक्ती विक्री प्रतिनिधी म्हणून काम करत होता. तसेच मालाची ने-आण करण्यासाठी वाहन चालक म्हणून तेजस शिंदे काम पहात होता.
हे दोघे ब्लूबेरी आणि एव्होकॅडो या महागड्या फळांचे बॉक्स परस्पर विक्री करून पैसे वाटून घेत होते. गेली सहा महिन्यांपासून जवळपास २५ लाख रुपयांचा माल त्यांनी विकला होता. हा प्रकार कंपनीचे व्यवस्थापक शशिकांत अडसूळ यांच्या लक्षात येताच त्यांनी एपीएमसी पोलिसांच्या मदतीने या दोघांसह माल घेणाऱ्या अनुज गोयल नामक ग्राहकाला गजाआड केले आहे.
मुंबई APMC फळ मार्केटमधील अनुसया फ्रेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी विदेशी फळांची आयात आणि निर्यात करते. गेली ६० वर्षांपासून हि कंपनी कार्यरत असून देशासह परदेशात जवळपास २० कार्यालये या कंपनीची आहेत. या कंपनीला २५ लाखांचा गंडा घालण्यात आला असून हा प्रकार कंपनीतील कर्मचाऱ्यांनीच केल्याने कुंपणच शेत खात असल्याचे दिसून आले.
हेही वाचा : लाईटची चिंता सोडा; जिल्हा सहकारी बँके कडून सोलर पंप साठी मिळणार कर्ज
म्हणूच शेतकरी राहतोय वंचित..! कृषी योजनांसाठी फक्त अठरा टक्केच निधी खर्च
या कंपनीत तेजस शिंदे आणि जुनेद शेख हे गेली एक वर्षांपासून काम करत होते. तीन-चार महिन्यांपासून डिलिव्हरीपेक्षा अधिकचे बॉक्स गोडाऊनमधून घेऊन बाहेर गपचूप ग्राहकाला विकण्याचा कारनामा या दोघांचा सुरु होता. परंतू गेल्या महिन्यापासून तेजस वारंवार गैरहजर राहू लागल्याने त्याला कामावरून काढण्यात आले. त्याच्या जागेवर कार चालक विजय राठोड याला काम देण्यात आले. यावेळी जुनेद शेखने त्याला सुद्धा अशा प्रकारे फळे काढण्यास सांगून पैसे कमावण्याचे आमिष दाखवले.
हेही वाचा : यूक्रेन-रशिया वादाची झळ भारताला बसणार; महागाईचा उडणार भडका
मात्र विजय राठोडने हा प्रकार त्वरित कंपनीचे व्यवस्थापक शशिकांत अडसूळ यांच्या कानावर घातला. अडसूळ यांनी पोलिसांकडे तक्रार करताच या तिघांना एपीएमसी पोलिसांनी अटक केली. हा प्रकार वेळेत माहित पडल्यामुळे करोडो रुपयांचा अपहार टळला असून ग्राहक अनुज गोयल याने अशा प्रकारे आणखी किती जणांना फसवले आहे. याचा तपास एपीएमसी पोलीस करत आहेत.
Share your comments