1. बातम्या

राज्यात १ ऑगस्टपासून दूध आंदोलनाचा उद्रेक

KJ Staff
KJ Staff


पुणे  : कोरोनाच्या संटाकातमुळे झालेले नुकसान. सरकारने बंद केलेली अतिरिक्त दूध खरेदी योजना तसेच सरकारतर्फे शेतकऱ्यांनामिळत नसलेलं अनुदान याच्या पार्श्वभूमीवर राज्यतील विविध शेतकरी संघटनांनी राज्यात १ ऑगस्टपासून जोरदार आंदोलने करण्याचा निर्णय घेतला आहे.ही माहिती डाव्या शेतकरी संघटनेचे नेते आणि दूध संघर्ष संघटनेचे नेते अजित नवले यांनी दिली.

राज्यातील शेतकरी संघटनांची २५ जुलैला ऑनलाईन बैठक पार पडली त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. दुधाला किमान ३० रुपये दर मिळावा, शेतकऱ्यांना अनुदान मिळावे यासाठी या संघटना आंदोलन करणार आहेत. राज्यात मागील काही दिवसं[असून मोठया प्रमाणावर आंदोलने सुरु आहेत. मात्र १ ऑगस्ट पासून या आंदोलनाला संघटित रूप प्राप्त होईल असे समितीकडून सांगण्यात आले आहे. या आंदोलनात राजकीय पक्षांच्या नेत्यासह शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आंदोलनात सहभागी होत आहेत.

पहिल्या टप्प्यातील आंदोलन झाल्यानंतर आता १ ऑगस्टपासून नव्याने आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय झाला आहे. दरम्यान मागण्या मान्य होईपर्यत आंदोलन सुरुच राहिल, असे यावेळी सांगण्यात आले. या बैठकीला रयतचे सदाभाऊ खोत, अजित नवले,सुरेश नवले, धुमाळ, उमेश देशमुख, संदीप कडलग, खंडू वाकचौरे, अनिल देठे उपस्थित होते. कोरोनामुळे सर्व सामान्य शेतकरी भरडला जात आहे. दिवसेंदीवस दुधाचा प्रश्न अधिक गंभीर होत चालला आहे.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters