
mother dairy rate
गेल्या काही दिवसांपासून देशात मोठी महागाई झाली आहे. यामध्ये दुधाचे दर देखील वाढले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना चार पैसे मिळू लागले आहेत. आधीच दुधाच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामध्ये पुन्हा एकदा दुधाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.
यामुळे आता शेतकऱ्यांना पुन्हा चांगले दिवस येण्याची शक्यता आहे. सध्या वाढत असलेल्या महागाईमुळे दूध आणि दह्याच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. आता मदर डेअरी कंपनीने दुग्ध उत्पादनाच्या किंमती वाढण्याचा विचार केला आहे. याची कारणे देखील सांगितली आहेत.
सध्याच्या आर्थिक वर्षात मदर डेअरीमधील प्रोडक्टवर २० टक्के किंमत वाढण्याची शक्यता आहे. मदर डेअरीचा टर्नओव्हर १५ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. तसेच ही कंपनी फळ आणि भाज्यांच्या क्षेत्रातही उतरली आहे. यामुळे याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
पेरु च्या शेतीतून नशीब बदलले, शेटफळचा पेरु पोहोचला केरळच्या बाजारात, दोन एकरात 14 लाखांचे उत्पन्न
यामुळे आता तिथल्या किंमतींवर याचा काय परिणाम होणार ते पाहावे लागणार आहे. काही दिवसांपूर्वीच दूध-दह्याचे दर वाढवण्यात आले आहेत. दरवाढीत शेतकऱ्यांना फायदा होत असल्याचा दावा कंपनी करत आहे.
बातमी कामाची! पीक नुकसानीचे 1106 कोटी आले; उद्यापासून बँक खात्यांत होणार जमा
चालू वर्षात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या मागणीत 15 टक्क्यांहून अधिक वाढ होत आहे. येणाऱ्या काळात देखील ही वाढ अशीच राहण्याची शक्यता आहे. यामुळे आता हे दर कधी वाढणार हे येणाऱ्या काळात समजणार आहे.
महत्वाच्या बातम्या;
माळेगावला गावे जोडण्यास सभासदांचा विरोध, शेतकरी न्यायालयात जाणार
शेतकऱ्यांनो घोणस अळीचा विषारी दंश झाला तर लगेच करा 'हे' उपाय
नोकरीला काय करता, डाळिंबाची लागवड करून अवघ्या सातशे झाडांपासून कमावले १८ लाख रुपये
Share your comments