महाराष्ट्रात दूधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. परंतु दुधाला हवा तसा दर मिळत नसल्याने दूध उत्पादकांना दूग्धव्यवसाय परडवत नाही. परंतु दूध संस्था आणि राज्य सरकारच्या एका निर्णयामुळे दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांना आनंद झाल्याशिवाय राहणार नाही.
दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाला प्रतिलिटर किमान २५ रुपये आधारभूत किंमत(एफआरपी) देण्यावर राज्यातील दूध संस्था आणि राज्य सरकारच्या प्रतिनिधींमध्ये बुधवारी मुंबईत झालेल्या पहिल्याच बैठकीत एमकत झाले. आजच्या या बैठकीत प्राथमिक चर्चा झाली. परंतु याला अंतिम स्वरुप देण्यासाठी दर दोन दोन महिन्यांनी बैठक घेऊन, अंतिम निर्णय घेण्यास दूध खरेदी दरावरुन शेतकऱ्यांची हालअपेष्टा कायमस्वरुपी थांबविण्यासाठी उसाच्या धर्तीवर दुधाचीही एफआरपी व किमान हमीभाव (एमएसपी) निश्चित करावा, असा प्रस्ताव राज्यस्तरीय दूध सल्लागार समितीने राज्य सरकारपुढे ठेवला होता.
यावर चर्चा करण्यासाठी डॉ. तुमोड यांनी आज सल्लागार समिती आणि विविध दूध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबईत बोलवली होती, असे सल्लागार समितीचे सदस्य प्रकाश कुतवळ यांनी सांगितले.
या बैठकीला सहाय्यक दुग्धविकास आयुक्त श्रीकांत शिपूरकर, महानंदा दूध डेअरीचे अध्यक्ष रणजित देशमूक यांच्यासह सल्लगार समितीचे सर्व सदस्य आणि राज्यातील सहकारी व खासगी दूध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
Share your comments