MFOI Samrudh Kisan Utsav 2024 : देशातील नामवंत कृषी मिडीया हाऊस सातत्याने नवनवीन कार्यक्रम घेऊन शेतकऱ्यांना प्रोत्साहित करत असते. आज (दि.९) रोजी हरियाणाच्या गुरुग्राम जिल्ह्यातील शिकोहपूर कृषी विज्ञान केंद्र येथे कृषी जागरण आयोजित आणि महिंद्रा ट्रॅक्टर प्रायोजित बाय 'समृद्ध किसान उत्सव २०२४' पार पडत आहे. या एकदिवसीय समृद्ध कृषी महोत्सवाची थीम "रब्बी पिकांमधील रोग आणि कीड व्यवस्थापन, ट्रॅक्टर उद्योगातील नाविन्य, ट्रॅक्टर व्यवस्थापन आणि भरडधान्य पीक लागवड" यावर आहे.
या एकदिवसीय कृषी प्रदर्शन महोत्सवात अडीचशेहून अधिक शेतकरी सहभागी झाले आहेत. या कृषी महोत्सवात महिंद्रा ट्रॅक्टर्स आणि ह्युंदाईसह अनेक कंपन्याही सहभागी झाल्या आहेत. या मेळ्यात शेतीशी संबंधित अनेक सत्रेही आयोजित केली जाणार आहेत.
देशातील अग्रगण्य कृषी मीडिया हाऊस कृषी जागरण गेल्या २७ वर्षांपासून कृषी क्षेत्रात उत्तम काम अव्याहतपणे काम करत आहे. त्याचबरोबर कृषी जागरण कंपनी वेळोवेळी कृषी मेळावे आयोजित करत असते, ज्याचा उद्देश कृषी तज्ज्ञांमार्फत शेतकऱ्यांमध्ये तांत्रिक माहिती उपलब्ध करून देणे, जनजागृती करणे आणि त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे, जेणेकरून शेतकरी जागरूक व्हावेत.
गतवर्षी ६ ते ८ डिसेंबर २०२३ रोजी 'महिंद्रा मिलियनेअर फार्मर ऑफ इंडिया अवॉर्ड्स-२०२३' चे आयोजन पुसा IARI फेअर ग्राउंड, नवी दिल्ली येथे करण्यात आले होते. जे कृषी जागरणने आयोजित केले होते आणि महिंद्रा ट्रॅक्टर्सने प्रायोजित केले होते. या तीन दिवसीय मिलियनेयर शेतकरी सन्मान सोहळ्यात कृषी क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला. याशिवाय देशभरातून हजारो शेतकरी यावेळी सहभागी झाले होते. यादरम्यान देशभरातील शेकडो शेतकऱ्यांना 'मिलियनेअर फार्मर ऑफ इंडिया अवॉर्ड्स-२०२३' ने सन्मानित करण्यात आले. याच क्रमाने कृषी जागरणने आज समृद्ध किसान उत्सव मेळाव्याचे आयोजन केले आहे.
या समृद्ध कृषी महोत्सवात शेकडो शेतकरी सहभागी झाले आहेत. याशिवाय महिंद्रा ट्रॅक्टर्स आणि ह्युंदाईसह अनेक कंपन्या या समृद्ध कृषी महोत्सवात सहभागी झाल्या आहेत. त्याचबरोबर या कृषी महोत्सवाची थीम ‘रब्बी पिकांमधील रोग आणि कीड व्यवस्थापन, ट्रॅक्टर उद्योगातील नावीन्य, ट्रॅक्टर व्यवस्थापन आणि भरड धान्याची लागवड’ अशी आहे.
दरम्यान, या समृद्ध शेतकरी महोत्सवात कृषी जागरणचे संस्थापक आणि मुख्य संपादक एम.सी. डॉमिनिक, शायनी डॉमिनिक, व्यवस्थापकीय संचालक कृषी जागरण, डॉ. भारत सिंग, एसएमएस, नेहा यादव, जिल्हा फलोत्पादन अधिकारी, फलोत्पादन विभाग, गुरुग्राम, पूजा, SHG, राव मान सिंग, अध्यक्ष, प्रगतिशील शेतकरी, किसान क्लब, जिल्हा गुरुग्राम, हरियाणा, डॉ.अनामिका शर्मा, KVK, डॉ.अनिल कुमार, उपसंचालक, कृषी विभाग, गुरुग्राम आदींनी सहभाग घेतला आहे.
Share your comments