1. बातम्या

MFOI Samridh Kisan Utsav 2024: केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रांकडून MFOI उपक्रमाचे कौतुक, म्हणाले...

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि समृद्ध भारतासाठी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे या थीमवर हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यावेळी कृषी क्षेत्राशी संबंधित तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित आणि नवीन तंत्रज्ञानाची माहिती दिली. शेतीत नवनवीन प्रयोग करून शेतकरी आपले उत्पन्न कसे वाढवू शकतो हे त्यांना सांगण्यात आले. याशिवाय कृषी जागरणचा विशेष उपक्रम असलेल्या 'मिलियनेअर फार्मर ऑफ इंडिया' (MFOI) पुरस्काराबाबतही शेतकऱ्यांना जागरूक करण्यात आले.

MFOI Event Lakhimpur Kheri

MFOI Event Lakhimpur Kheri

MFOI Samridh Kisan Utsav 2024 : कृषी पत्रकारितेतील कृषी जागरण गेल्या 27 वर्षांपासून सातत्याने शेतकरी आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी कार्य करत आहे. कृषी जागरण वेळोवेळी शेतकऱ्यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असते. याच अनुक्रमाने कृषी जागरणने शुक्रवारी (23 फेब्रुवारी) उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे MFOI समृद्ध किसान उत्सव 2024 चे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रा टेनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी शेतीत सातत्याने होत असलेला विकास आणि शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांवर आपले विचार मांडले. याशिवाय महिंद्र ट्रॅक्टरसह कृषी क्षेत्राशी संबंधित अनेक कंपन्या, अनेक कृषी तज्ज्ञ, कृषी विभागाचे अधिकारी, लक्षपती शेतकरी आणि अनेक प्रगतीशील शेतकरी या मेळ्यात सहभागी झाले होते.

मिलिनेयर शेतकऱ्याचा गौरव

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि समृद्ध भारतासाठी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे या थीमवर हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यावेळी कृषी क्षेत्राशी संबंधित तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित आणि नवीन तंत्रज्ञानाची माहिती दिली. शेतीत नवनवीन प्रयोग करून शेतकरी आपले उत्पन्न कसे वाढवू शकतो हे त्यांना सांगण्यात आले. याशिवाय कृषी जागरणचा विशेष उपक्रम असलेल्या 'मिलियनेअर फार्मर ऑफ इंडिया' (MFOI) पुरस्काराबाबतही शेतकऱ्यांना जागरूक करण्यात आले. सर्वप्रथम शेतकऱ्यांना MFOI म्हणजे काय आणि ते शेतकऱ्यांसाठी का महत्त्वाचे आहे हे सांगण्यात आले. यानंतर शेतीत उत्कृष्ट काम करणाऱ्या मिलिनेयर शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे, केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रा टेनी यांच्या हस्ते मिलिनेयर शेतकऱ्यांना MFOI चे प्रशस्तीपत्र आणि ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला.

'शेतकरी देशाची शान, त्यांना नक्कीच सन्मान मिळेल'

कार्यक्रमाला संबोधित करताना कृषी जागरण आणि कृषी जागरणचे संस्थापक आणि मुख्य संपादक एम.सी. डॉमिनिक म्हणाले की, मी स्वतः एक शेतकरी आहे आणि मला शेतीची चांगली जाण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या वेदना मी समजू शकतो. शेतकरी रात्रंदिवस मेहनत करतो, तरच पीक तयार होते आणि लोक धान्य खाण्यास सक्षम होतात, असे ते म्हणाले. मात्र, शेतकऱ्यांना पाहिजे तसा सन्मान मिळाला नाही. प्रत्येक क्षेत्रात नक्कीच काही ना काही आदर्श असतो. सर्वात श्रीमंत व्यक्तीचा विचार केला की मुकेश अंबानी यांचे नाव डोळ्यासमोर येते. पण शेतीचा प्रश्न आला की त्यावर कोणीच चर्चा करत नाही. शेतकऱ्यांसाठीही काहीतरी आदर्श असायला हवे, असे ते म्हणाले. शेतकरी हा या देशाची शान असून त्यांना त्यांचा सन्मान देण्यासाठी कृषी जागरणने MFOI हा उपक्रम सुरू केला आहे.

'MFOI मध्ये जगभरातील शेतकरी सहभागी होतील'

गेल्या वर्षी MFOI 2023 चा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि त्याच्या यशानंतर या वर्षी डिसेंबरमध्ये MFOI चे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी केवळ भारतच नाही तर जगातील विविध देशांतील शेतकरी MFOI मध्ये सहभागी होणार आहेत. जगभरातील शेतकरी यात सहभागी होतील आणि तुम्हा सर्वांना त्यांचे मत ऐकण्याची आणि मांडण्याची संधी मिळेल, असे डॉमिनिक म्हणाले. तसंच 2024 च्या MFOI कार्यक्रमात शेतकऱ्यांनी सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असं आवाहन त्यांनी केले.

'सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत आहे'

शेतकऱ्यांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रा टेनी म्हणाले की, देशात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून शेतकऱ्यांच्या हिताची अनेक कामे केली आहेत. मोदी सरकारही शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असून त्याचा त्यांना पुरेपूर लाभ मिळत आहे. या योजनांचा परिणाम आहे की आज कृषी क्षेत्राचा झपाट्याने विकास होत असून नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी आपले उत्पन्न दुप्पट करत आहेत.

केंद्रीय मंत्र्यांनी MFOI च्या उपक्रमाचे कौतुक केले

शेतकरी हा या देशाचा शान असून तुम्ही सर्वांच्या मेहनतीने देशात आणि समाजात वेगळी ओळख निर्माण केली आहे. शेतकऱ्यांच्या या ओळखीला एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा उत्कृष्ट प्रयत्न कृषी जागरणने केला आहे. ज्याचे मला कौतुक वाटते. 'मिलियनेअर फार्मर' हा वेगळ्या प्रकारचा उपक्रम आहे. ज्याचा कोणी विचारही केला नाही. पण, आज कृषी जागरणने ते काम केले आहे. आमचे सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हाच या योजनांचा उद्देश नसून शेतकऱ्यांचे जीवन सुसह्य करणे हा असून या दिशेने शेतकरी सातत्याने काम करत आहेत आणि भविष्यातही करत राहतील, असे मिश्रा म्हणाले.

English Summary: MFOI Samridh Kisan Utsav 2024 Union Minister Ajay Kumar Mishra lauds MFOI initiative Lakhimpur Kheri Published on: 25 February 2024, 01:30 IST

Like this article?

Hey! I am ऋषिकेश चंद्रकांत काळंगे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters