12 डिसेंबर 2023 रोजी म्हणजेच मंगळवारी, कोटा, राजस्थान येथे कृषी विज्ञान केंद्राच्या सहकार्याने जिल्हास्तरीय मिलेनियर फार्मर ऑफ इंडिया पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, शेतकऱ्यांसाठी विशेष जनजागृती सत्रही घेण्यात आले. शेतकऱ्यांना वेगळी ओळख देण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्याचा एक उपक्रम म्हणून 'MFOI किसान भारत यात्रा' आता राज्य आणि जिल्हा स्तरावर पोहोचली आहे. आता एमएफओआयच्या पुढाकारातून जिल्हास्तरीय शेतकऱ्यांचा गौरव करण्यात येत आहे. कार्यक्रमात रब्बी पिकावरील रोग व किडींचे व्यवस्थापन, बाजरीची लागवड, ट्रॅक्टरची देखभाल यासंदर्भातही विशेष चर्चा करण्यात आली.
यावेळी शेतकऱ्यांना शेतीतील पाण्याचा वापर आणि पिक संवर्धनासंबंधी सूक्ष्म सिंचन पद्धतीची माहिती देण्यात आली. याशिवाय त्यांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहितीही देण्यात आली, जेणेकरून त्यांना योजनांची माहिती मिळू शकेल. या कार्यक्रलमाच्या शेवटी जिल्हास्तरावर कृषी क्षेत्रात यश संपादन केलेल्या अनेक शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. कृषी जागरण अॅग्रिकल्चरल वर्ल्डचे संस्थापक आणि मुख्य संपादक एम.सी. डॉमिनिक यांनी शेतकर्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविले. या सन्मान सोहळ्यात डॉ. महेंद्र सिंग, संचालक एचआरडी आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ-प्रमुख, कोटा KVK, उपसंचालक, उद्यान विभाग कोटा, आनंदी लाल मीना आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
MFOI किसान भारत यात्रेचे उद्दिष्ट -
MFOI किसान भारत यात्रेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणे आहे, जेणेकरून शेतकर्यांची सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमी वाढवून त्यांना सक्षम बनवता येईल. तसेच डिसेंबर 2023 ते नोव्हेंबर 2024 या कालावधीत देशभरात फिरणे, 1 लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे, 4 हजार पेक्षा जास्त ठिकाणांचे विस्तीर्ण नेटवर्क आणि 26 हजार किमी पेक्षा जास्त उल्लेखनीय अंतर कव्हर केले जाणार आहे.
मिलेनियर फार्मर ऑफ इंडिया पुरस्कार -
कृषी जागरण आयोजित आणि महिंद्रा ट्रॅक्टर्सने प्रायोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये वार्षिक 10 लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या आणि शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून आपल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांसाठी आदर्श निर्माण करणाऱ्या शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम 6 ते 8 डिसेंबर 2023 रोजी IARI मेला ग्राउंड, पुसा, नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता. यासोबतच कृषी जागरण मिडीया हाउसच्या या उपक्रमांतर्गत आता राज्य व जिल्हास्तरीय शेतकऱ्यांचाही गौरव करण्यात येत आहे.
Share your comments