सध्या मान्सूनचे आगमन महाराष्ट्रत झाले असून सध्या तरी चांगल्या प्रकारचे पोषक वातावरण मान्सूनच्या प्रवासासाठी आहे.
काल महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांमध्ये पावसाने चांगली हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी आता खरीपाच्या पेरणीच्या तयारीला जोमात लागले असून शेतकर्यांनी पेरणी देखील सुरू केली आहे. कारण सध्याचा विचार केला तर या परिस्थितीनुसार मान्सूनसाठी वातावरणीय अनुकूलता दिसत आहे.
परंतु या सगळ्या पेरणीच्या आणि खरीप हंगामाच्या धामधुमीत हवामान तज्ञांनी शेतकऱ्यांना सांगितले आहे की शेतकऱ्यांच्या पेरणीची घाई करू नये.हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांच्या माहितीनुसार,काल वेंगुरला मध्ये दाखल झालेला मान्सून आज रत्नागिरी,मुंबई आणि ठाण्यासह काही भाग वगळता जवळपास संपूर्ण कोकणात पंजाब महाराष्ट्राचा एकंदरीत विचार केला तर 15 ते 20 टक्के महाराष्ट्र काबीज करत पुणे, डहाणू पर्यंत पोहोचला आहे.
परंतु या दृष्टिकोनातून विचार केला तर नाशिक मध्ये अजूनही मान्सून पोहोचला नसून ठाणे जिल्ह्यातील जव्हार मोखाडा, उत्तर कोकणातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि पेठ भाग अजूनही पार करायचा बाकी असून14 जून पर्यंत संपूर्ण घाटमाथा आणि धुळे, जळगाव, नगर, नाशिक, सांगली त्यासोबतच सातारा, पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्याचा उर्वरित तर मराठवाड्याचा काही भाग काबीज करण्यासाठी सध्या तरी चांगली परिस्थिती या असल्याचे दिसत आहे.
नक्की वाचा:आला आला पाऊस आला!मान्सूनची मुंबईत एन्ट्री, पाच दिवसात राज्यभर पाऊस धारा
परंतु तरीसुद्धा शेतकर्यांनी पेरणीची घाई करू नये कारण मान्सूनचे आगमन जरी होण्याची चिन्हे दिसत असलेले परंतु वातावरणातील बदल लक्षात घेता मान्सून लांबण्याची देखील दाट शक्यता हवामान तज्ञांकडून व्यक्त केली जात असल्यामुळे ज्या भागात पाऊस पडला आहे
त्या भागातील शेतकऱ्यांनी पेरणीचे पूर्वीची कामे करून घ्यायला काही हरकत नाही मात्र पेरणी करू नये. पुरेशा पावसाचे आगमन होईल त्या वेळेसच वातावरणातील बदल लक्षात घेता हवामान शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार पेरणी सुरुवात करावी असे आव्हान जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी देखील केले आहे.
सध्याच्या अंदाजानुसार पावसाचे आगमन लांबणीवर पडण्याची शक्यता असल्यामुळे पावसाचा अंदाज घेऊनच पेरणीचे सुरुवात करावी. साधारणतः 80 ते 100 मिलिमीटर पावसाची नोंद झाल्यावर पेरणी योग्य पाऊस झाल्याचे समजून पेरणी करावी अन्यथा त्याआधी पेरणी करू नये. नाहीतर दुबार पेरणीचे संकट वाढण्याची दाट शक्यता आहे, असेदेखील तज्ञांचे मत आहे.
Share your comments